Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लीग कप: मँचेस्टर सिटी आणि लिव्हरपूलचा सहज विजय,एव्हर्टन चा पराभव

Webdunia
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (14:08 IST)
इंग्लिश लीग कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद सलग पाचव्यांदा जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या मँचेस्टर सिटीने चार वर्षांत पहिल्यांदाच सुरुवातीचा गोल गमावला पण लवकरच त्याने चांगले पुनरागमन करून वेकॉम्ब वांडरर्सवर 6-1 ने असा मोठा विजय नोंदवला.
 
तृतीय श्रेणीच्या स्पर्धेत खेळताना, वांडरर्सने 22 व्या मिनिटाला आघाडी घेत सर्वांना आश्चर्यचकित केले, परंतु मँचेस्टर सिटीने लवकरच आपली क्षमता दाखवली आणि दोन्ही भागांमध्ये प्रत्येकी तीन गोल करून सहज विजय नोंदवला. लीग कपमध्ये मँचेस्टर सिटीचा शेवटचा पराभव ऑक्टोबर 2016 मध्ये झाला होता आणि जानेवारी 2018 मध्ये उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यापासून त्यांनी एकही सामना गमावला नाही.
 
दुसऱ्या सामन्यात लिव्हरपूलने प्रीमियर लीग संघ नॉर्विचवर 3-0 ने मात केली. लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी दोघेही लीग कपमधील विक्रमी आठव्या जेतेपदाच्या शोधात आहेत. मँचेस्टर सिटीने गेल्या आठ हंगामात सहा जेतेपदे जिंकली आहेत. दरम्यान, दुसऱ्या श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या क्वीन्स पार्क रेंजर्सकडून प्रीमियर लीग संघ एव्हर्टनला पेनल्टी शूटआऊटमध्ये 8-7 ने पराभूत व्हावे लागले. नियमित वेळेपर्यंत स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता. फुलहॅमविरुद्ध गोलशून्य सामन्यानंतर लीड्सने शूटआऊट 6-5 ने जिंकले.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments