Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

OTP म्हणजे काय असतं? कुठे आणि का वापरलं जातं जाणून घ्या संपूर्ण माहिती

Webdunia
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (10:19 IST)
OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड. ओटीपी हा एक सुरक्षा कोड आहे, जो ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरला जातो. ऑनलाईन बँकेचा व्यवहार असो किंवा ऑनलाईन डेबिट किंवा क्रेडीट कार्डाने देय देणे असो, ओटीपी ने व्हेरिफाय करणं महत्वाचं असतं. ओटीपी हे 4 ते 8 अंकी एक सुरक्षा कोड असतो. जे व्हेरिफाय करण्यासाठी आपल्या मोबाईलनंबर वर मॅसेज रूपात येतं. ओटीपी ला आपण एक Security Password देखील म्हणू शकतो, हे नेहमी रिक्वेस्ट केल्यावर आपोआप तयार होतं. हे प्रत्येक वेळी वेगवेगळं असतं. याचा अर्थ असा आहे की ओटीपी हा एक युनिक कोड आहे.
 
ऑनलाईन देय व्यवहार करणारे अ‍ॅप साठी ओटीपी वापरण्यात येतं. ई- कॉमर्स च्या साईट्सवर नवीन खाते उघडण्यासाठी देखील आपल्या मोबाइलला ओटीपी ने व्हेरिफाय म्हणजे सत्यापित केलं जातं.

सध्याच्या काळात प्रत्येक वेबसाईट किंवा संकेत स्थळावर जिथे ऑनलाईन ट्रॅान्जेक्शन करण्यासाठी किंवा सुरक्षिततेची जास्त गरज असल्यावर मोबाइल नंबर किंवा ई मेल हे ओटीपी ने सत्यापित केले जाते.
 
ओटीपीची गरज कशाला?
आजकाल सर्व काही काम ऑनलाईन होत आहे, म्हणून कोणत्याही प्रकारच्या अकाउंटसाठी हे सुरक्षेच्या दृष्टींने महत्वाचं असतं. मग ते खातं ऑनलाईन खरेदीसाठीचा असो किंवा ऑनलाईन बँकिंगचा असो, सुरक्षितता सर्वात जास्त महत्वाची आहे.
 
जर आपलं युजर नेम आणि पासवर्ड एखाद्याकडे असल्यावर ही तो आपल्या खात्यामधून देय करू शकत नाही कारण ट्राजेक्शन करण्यासाठी OTP Verification करणं महत्वाचं आहे. ऑनलाईन फिशिंग किंवा सायबर ठगी होण्यापासून वाचण्यासाठी ओटीपी चे सत्यापन गरजेचं आहे. 
 
सध्या पासवर्ड किंवा युजरनेम हॅकिंग करण्याचा धोका वाढतच आहे. म्हणून शेवटची स्टेप म्हणजे ओटीपी व्हेरिफिकेशनची आहे, ज्यामुळे पासवर्ड चोरी झाल्यावर सुद्धा आपले खाते सुरक्षित राहणार. 

गुगल देखील युजर्सच्या खात्याला सुरक्षित राखण्यासाठी ओटीपी व्हॅरिफिकेशन करतं. 
 
आजच्या इंटरनेटच्या काळात डेटा सुरक्षित ठेवणं सर्वात महत्वाचा काम आहे आणि ओटीपी व्हेरिफिकेशन सर्वात चांगली सुरक्षा आहे. OTP दरवेळी बदलला जातो जेणेकरून आपले खाते पूर्णपणे सुरक्षित ठेवते.
 
ओटीपी कोणाशीही शेअर करू नये
OTP कोड केवळ एकदाच वापरला जातो. बँकेच्या नावाने OTP साठी कॉल आल्यावरही कोणत्याही अटीवर OTP सांगू नये. OTP कोणाबरोबर शेअर करू नये. ओटीपीविषयी माहिती मिळवणे गुन्हा मानले जाते. अनेकदा यूजरचं खातं असलेल्या बॅंकेत ओटीपी हवा आहे, असं खोटं सांगून ओटीपी मागितला जातो. पण खरी गोष्ट अशी की, कोणतीही बँक आपल्या ग्राहकांकडे OTP मागत नाही. मोबाईल, ई-मेल किंवा अन्य कुठेही आलेला ओटीपी कधीही कोणालाही सांगू नये.
 
पेमेंट करताना सतर्क रहावे
ओटीपीच्या माध्यमातून व्यवहार करताना नेमका किती रुपयांचा व्यवहार केला जात आहे तसेच त्या पेजचा स्रोत आणि देण-घेण व्यवहाराकडे कडे लक्ष ठेवावे. ते विश्वसनीय असल्याची खात्री करुन घ्यावी. काहीही चुकीचं किंवा अव्यवहारिक आढळत असल्यास लगेच पेमेंट रद्द करावे.
 
पैसे घेण्यासाठी ओटीपीची गरज नसते
ओटीपी फक्त पैसे देताना लागतो. पैसे घेत असताना ओटीपीची गरज पडत नाही. अनेकदा यूजरला पैसे पाठवत असल्याचं लालूस देऊन ओटीपी मागतिला जातो हे फ्रॉड आहे आणि खोटं सांगूनही ओटीपी उकळला जातो. मात्र, पैसे देणार्‍याकडे ओटीपी येत असतो स्विकार करणार्‍याकडे नव्हे म्हणून अशात आपली फसवणूक होण्याची पूर्णपणे शक्यता असते.
 
स्त्रोत अधिकृत असावे
पैसे भरताना फक्त अधिकृत अॅप्स किंवा वेबसाइटचा वापर करावा. अॅप किंव साईट अधिकृत नसल्यास ओटीपी ट्रॅक होऊन पैशाची चोरी केली जाते. या व्यतिरिक्त खासगी माहिती देखील लिक होते.
 
कस्टमर केअरशी संपर्क करताना काळजी घ्या
बॅंक अकाउंटसंबंधी किंवा डिजिटल व्यवहार करताना कुठलीही शंका असल्यास नेहमी अधिकृत कस्टमर केअरशी संपर्क करावा. अनाधिकृत नंबरवर आपली समस्या सांगितल्यावर फसवणूकीची शक्यता अधिक असते. अनाधिकृत नंबरवर संपर्क झाल्यास डाटा चोरी केला जाऊ शकतो. अनेकदा सर्च इंजिनवर सापडणारे कस्टमर केअर नंबर खोटे असतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई,चकमकीत 11 अतिरेकी ठार

मुंबईत प्लास्टिकच्या पिशवीत तुकड्यात मृतदेह आढळले

राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा भाजपचा आरोप, कारवाई करण्याची मागणी

निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली उद्धव ठाकरेंची बॅग, मोदींची तपासणार का म्हणाले

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments