Festival Posters

सुशांतचं कुटुंब सीबीआय तपासावर नाराज

Webdunia
शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (10:57 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सध्या सीबीआयकडून (CBI)केला जात आहे. मात्र, सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांपाठोपाठ सीबीआयच्या तपासावरही नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास भरकटला असल्याचं सांगत सुशांतचे कुटुंबीय तपासावर नाराज असल्याचा दावा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील (Mumbai)वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेतला होता. सुरूवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांच्या मागणीवरून सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं होतं. सध्या सीबीआय प्रकरणाचा तपास करत आहे.
दरम्यान, सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सुशांतचे कुटुंबीय सीबीआयच्या तपासावर नाराज असल्याचं म्हटलं आहे. “ज्या प्रकारे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून सुशांतच्या कुटुंबीयांना असं वाटतंय की यातून सत्य बाहेर येणार नाही. एनसीबीनंही मुंबई पोलिसांसारखच सुरू केलं आहे. एका एका कलाकाराला बोलवलं जात आहे. हा सगळा तपास मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणेच सुरू आहे. यात सुशांतचं प्रकरण पाठीमागे पडलं आहे,” असं विकास सिंह म्हणाले.

“सुशांतच्या कुटुंबीयांना वाटत की, या प्रकरणाचा तपास वेगळा दिशेनं व्हायला हवा. यात सगळं लक्ष ड्रग्ज (drugs)प्रकरणावर केंद्रित केलं गेलं आहे. एम्सच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, सुशांतचा मृत्यू गळा दाबल्यानं झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू नाहीये. या तपासावर मी नाखुश आहे. हे प्रकरण कोणत्या दिशेनं जात आहे माहिती नाही. आम्ही हताश आहोत. या प्रकरणात आतापर्यंत काय आढळून आलं, यासंदर्भात सीबीआयनं (CBI)एकदाही माहिती दिलेली नाही,” असं विकास सिंह म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

लोकप्रिय अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी

कामाच्या वाढत्या तासांवर अर्चना पुरण सिंग यांनी चिंता व्यक्त केली

कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र जागृत परशुराम मंदिर चिपळूण

ड्रामा, टास्क आणि ट्विस्ट्सचा जल्लोष – बिग बॉस मराठी 6 मधील 5 अविस्मरणीय क्षण!

अक्षय कुमारचा मुलगा आरव वयाच्या २३ व्या वर्षी करत आहे नोकरी; पगार ऐकून धक्का बसेल

पुढील लेख
Show comments