Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

’जमात'च्या फरार' मौलानाचा यू-टर्न

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (14:54 IST)
तबलिगी जमातच्या मरकजमध्ये उपस्थितांना ‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही' असा उपदेश करणार्‍या मौलाना साद यांनी घुमजाव केले असून त्यांचा आणखीन एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. दिल्लीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपण आयसोलेशनमध्ये असल्याचे साद यांनी म्हटले आहे. या ऑडिओमध्ये ते तबलिगी जमातच्या कार्यतर्त्यांना ‘डॉक्टरांकडे जाणे हे शरियतविरुद्ध नाही' असे समजावत देखील आहेत.

तबलिगी जमातचे अध्यक्ष साद यांचा हा ऑडिओ दिल्ली मरकजच्या यूट्यूब पेजवरून जाहीर करण्यात आला आहे. या संदेशात ‘जतातच्या कार्यकर्त्यांनी  सरकारला पूर्ण मदत करायला हवी आणि डॉक्टरांचा सल्लाही घ्यायला हवा' असे मौलाना साद म्हणत आहेत. त्यासोबतच यापुढे कुठेही ‘जमा' लावण्यात येऊ नये, असेही त्यांनी बजावले आहे. उल्लेखनीय म्हणजे, तबलिगी जमातचे अनेक क्वारंटाइन करण्यात आलेले लोक डॉक्टरांना सहकार्य करत नसल्याच्या बातम्या  समोर आल्या होत्या. त्यामुळे, साद यांनी आपल्या ऑडिओमध्ये जोर देऊन डॉक्टरांच्या सूचना पाळण्याचा संदेश दिला आहे. सोबतच हे शरियतच्या विरुद्ध नसल्याचेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments