Marathi Biodata Maker

कुरकुरीत चकली कशी बनवायची

Webdunia
कुरकुरीत चकल्यांसाठी या टिप्स लक्षात ठेवा
 
चकलीसाठी लागणारं पीठ थोडे वाफवून घेतले की चकली कुरकुरीत होते. 
 
साच्यामध्ये चकली बनवत असताना सारखी तुटत असेल तर पिठात थोडं पाणी आणि तेल घालून व्यवस्थित मळून घ्यावं. 
 
चकल्या तळताना तेल पूर्णपणे गरम होऊ द्यावं. चकल्या तेलात सोडताना आच मोठी असावी नंतर  साधारण १ मिनिटानंतर गॅस मंद करावा चकली लालसर होईपर्यंत तळावी.
 
चकली कुरकुरीत होण्यासाठी पिठात गरम करून मोहन टाकावं. पिठात बेताचं मोहन असावं तरी मोहन जास्त झाल्यास तेल न घालता थोडी भाजणीची उकड काढावी आणि आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिसळून घ्यावं. 
 
चकली भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास  चकली बिघडण्याची शक्यता असते. भाजणीची उकड मळताना नेहमी कोमट किंवा गरम पाण्याने मळावी.
 
चकली करण्याची कृती
चकलीच्या भाजणीचे साहित्य : 
जाड तांदूळ -1 किलो
अर्धा किलो चणाडाळ
50 ग्रॅम उडीद डाळ
200 ग्रॅम मूग डाळ
100 ग्रॅम साबुदाणे
100 ग्रॅम पोहे
25 ग्रॅम जीरे
25 ग्रॅम धणे
 
कृती : तांदूळ, डाळी व इतर साहित्य निवडून, धुवून पूर्णपणे निथळून घ्यावे. सुती कापडवर पसरून दिवसभर खडखडीत वाळवून घ्यावे. प्रत्येक डाळी मध्यम आचेवर भाजून घ्या. तांदूळदेखील भाजून घ्या. तसेच पोहेदेखील भाजून घ्या. खमंग भाजावे पण करपत नाहीये याची काळजी घ्यावी.
 
तसेच मध्यम आचेवर साबुदाणा फुलेपर्यंत भाजा. जिरे आणि धणेसुद्धा भाजून घ्या. भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून घ्या.
 
चकली बनवण्यासाठी कृती : चकलीचे पीठ चालून घ्या. जितकं हवं तितकंच पीठ घ्या. एकदम पीठ न मळता थोडेथोड पीठ मळून चकल्या बनवा. पिठात आपल्या चवीप्रमाणे मीठ, तिखट टाका. अंदाजे 2 वाटी भाजणीच्या पिठात 1 चमचा तिखट, 2 चमचे तीळ, 3 चमचे कडलेले तेल, 1 वाटी पाणी, 1 चमचा मीठ घालून मळून घ्या.
 
चकलीच्या सो‍च्याला आतून तेल लावा. नंतर एक पीठाचा गोळा करून साच्यामध्ये घाला आणि एका तेल लावलेल्या भांड्यात चकल्या पाडून घ्या.
 
गॅसवर एका कढईत तळण्यासाठीचं तेल चांगलं गरम करून घ्या. हळू हळू चकली सोडा. एकदम खूप चकल्या सोडू नका. चकल्यांचा रंग बदलू लागेल तसेच चकल्यांच्या भोवती बुडबुडे बंद होऊ लागल्यावर कढईतून चकल्या काढून घ्या आणि कागद्यावर पसरवून घ्या. खमंग आणि कुरकुरीत चकल्या तयार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

World Health Day 2026 जागतिक आरोग्य दिन कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

उन्हाळा स्पेशल थंडगार चविष्ट कोकोनट मिल्क आईस्क्रीम

Biography of Mangal Pandey :क्रांतिकारक मंगल पांडे यांची माहिती

सैल त्वचेला घट्ट करतात ही जीवनसत्वे, आहारात आवर्जून समावेश करा

Best career options after 12th १२ वी नंतर सर्वोत्तम करिअर पर्याय आणि संधी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments