Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Indian Mythological Stories : Father's Day पौराणिक कथेत वर्णित पितृ प्रेम

Webdunia
मंगळवार, 16 जून 2020 (15:59 IST)
फादर्स डे सध्याचा काळात जरी अस्तित्वात आले असले तरी ही शतकानुशतके मुलाचे आणि वडिलांचे संबंध आणि त्यांचा वेगवेगळ्या स्वरूपाचे वर्णन आपल्या शास्त्रामध्ये केले आहेत. 
 
फादर्स डे म्हणजे पितृदिन, वडिलांसाठी आपले प्रेम, आदर आणि अनेक भावनांना व्यक्त करण्याचा दिवस. आपले पुराण वडील आणि मुलाचे नातेसंबंध दर्शवतात आणि शिकवण देखील देतात. येथे आम्ही आपल्या काही पौराणिक वडील आणि मुलांच्या संबंधित महत्त्वाची माहिती पुरवत आहोत
 
1 महाभारतात पितृभक्ती : पितृ भक्तीचे विशिष्ट उदाहरण महाभारतामध्ये देवव्रतच्या पात्रांमधून दिसून येतं. हस्तिनापुराचे राजा शंतनूचे पराक्रमी आणि विद्वान पुत्र देवव्रत त्यांचा उत्तराधिकारी होता. पण एके दिवशी राजा शंतनू निषादच्या कन्येला सत्यवतीला भेटतात आणि तिच्या वर आसक्त होतात. ते सत्यवतीच्या वडिलांकडे तिच्याबरोबर विवाह करण्याची मागणी करतात. त्यावर सत्यवतीचे वडील एक अट ठेवतात की माझ्या मुलीपासून जन्मणारा पुत्रच हस्तिनापुराचा उत्तराधिकारी बनणार, तरच मी हे विवाह मान्य करीन. शंतनू देवव्रत बरोबर हे अन्याय करू शकत नव्हते. म्हणून ते जड मनाने परतले पण सत्यवतीच्या विरहामुळे त्यांची तब्येत ढासळत चालली होती. देवव्रतला आपल्या वडिलांच्या दुःखाचे कारण समजल्यावर ते सत्यवतीच्या वडिलांना भेटावयास गेले आणि त्यांना आश्वासन दिले की शांतनूनंतर सत्यवतीच्या पुत्रालाच सम्राट केले जाईल. 
 
त्यावर निषाद म्हणतात की आज आपण असे म्हणत आहात पण भविष्यात आपली होणारी मुले सत्यवतीच्या पुत्रांसाठी समस्या उत्पन्न करणार नाही ह्याची काय खात्री ! त्यावर देवव्रत त्यांना आश्वस्त करतात की अशी परिस्थिती कधीही उद्भवणार नाही आणि तिथेच ते आजीवन ब्रह्मचर्याच्या पालन करण्याची प्रतिज्ञा घेतात. यावर निषाद सत्यवती आणि शंतनूच्या लग्नाला तयार होतात. राजा शंतनूला आपल्या मुलाने घेतलेल्या प्रतिज्ञा बद्दल समजल्यावर ते देवव्रतला इच्छामरणाचे वर देतात आणि म्हणतात की की आपल्या प्रतिज्ञेसाठी आता आपण भीष्म या नावाने ओळखले जाणार.
 
2 राम-दशरथाची पितृ भक्ती : अयोध्याच्या राजसिंहासनाचे सर्वात यशस्वी उत्तराधिकारी प्रभू श्रीराम असे. राजाचा थोरला मुलगा होण्याच्या नात्याने ह्याच्यावर त्यांचा अधिकार होता. पण वडिलांची आज्ञा सर्व सुखांच्या पलीकडची होती. त्यांच्या आज्ञाचे मन राखून कोणतेही प्रश्नांचा, त्यागेचे, कुठलाही अहंकार न बाळगता अरण्यास जाणार तयार होते. दशरथाच्या मनात श्रीरामासाठी खूप वात्सल्य आणि स्नेह होते. पण ते वचनाने बांधलेले होते. एकीकडे मुलांवरचे प्रेम तर दुसरीकडे कैकेयीला दिलेले वचन पाळण्याचे कर्तव्य. 
 
या द्वंदात कर्तव्य जिंकले आणि दशरथाने रामाला वनवासाला जायचे आदेश दिले. 
रामाने वडिलांच्या आज्ञेचे पालन केले आणि अरण्यात गेले पण त्यांचे वडिलांचे काळीज पुत्र वियोग आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला सहन करू शकले नाही. शेवटी रामाचे नाव घेता घेता त्यांनी जगाचा निरोप घेतला.
 
3 उत्तरकांडाचे मुलं आणि वडिलांचे संबंध : इथे रामायणातच वडील आणि मुलांच्या नात्याचे अजून एक रंग दिसून येते. लव आणि कुश यांचे संगोपन त्यांचा वडिलांपासून लांब ऋषी वाल्मीकींच्या आश्रमात होते. ज्यावेळी श्रीरामाच्या अश्वमेध यज्ञाचे अश्व आश्रमात येतो त्यावेळी किशोर वयात आलेले लव आणि कुश त्याला नकळतच बांधून आपल्या वडिलांच्या सामर्थ्यास आव्हान देऊन त्यांचा सैन्याला पराभूत करतात. नियतीचे अदृश्य दोरे अश्या प्रकारे वडील आणि मुलांना समोरासमोर घेऊन येते.
 
4 शिव-पुराणाच्या दृष्टिकोनातून मुलगा आणि वडील : वडील आणि मुलाचा समोरासमोर शिव पुराणात देखील वेगळ्या शैलीमध्ये आहे. स्नानासाठी जाताना पार्वती आपल्या उटण्याचा मळीपासून एका सुंदर पुतळा तयार करते आणि आपल्या शक्तीने त्यामध्ये प्राण देते आणि त्याला सूचना देते की अंघोळ करून येई पर्यंत कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नये. काही वेळा नंतर स्वतः शंकर तेथे येतात आणि त्यांना आपल्या आईने सांगितल्याप्रमाणे तिच्या आदेशाचे पालन करीत तो मुलगा त्यांना जाण्यास रोखतो. शिव त्याला आपली ओळख देऊन सुद्धा तो त्यांना आत जाऊ देण्यास तयार होत नाही. संतापून ते त्याचे डोकं धडापासून वेगळं करतात.
 
पार्वतीला हे कळल्यावर ती दुखी होते आणि त्या मुलाच्या जन्माच्याविषयी सांगते आणि आपल्या पतीला त्याला परत जिवंत करायला सांगते. तेव्हा शिव हत्तीच्या मुलाचे डोकं त्या मुलाच्या धडावर ठेवून त्याला जिवंत करतात आणि त्याला गणेश नाव देऊन सर्व गणामध्ये श्रेष्ठ घोषित करतात. आणि म्हणतात की गणेश सर्व देवांमध्ये पहिले पुजले जातील.
 
5 धृतराष्ट्राची पितृ भक्ती : जेथे राम आणि देवव्रतच्या कथांमधून पितृ भक्तीमुळे मुलाची भक्कम असलेली बाजू दिसून येते तिथेच धृतराष्ट्राचे उदाहरण मुलाच्या मोहाच्या पोटी त्यातील कमकुवत पक्ष दाखवते. धृतराष्ट्राचा सर्व चांगुलपणा आपल्या वाईट मुलगा दुर्योधनाच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या गुन्ह्यांमुळे वाया गेला आहे. 
 
दुर्योधनाने पांडवांबरोबर केलेल्या प्रत्येक अन्यायाला, प्रत्येक अपमानाला धृतराष्ट्राने मौनपणे मान्यता दिली. भीष्म आणि विदुर सारख्या ज्येष्ठांचा सल्ला असो की साध्यासरळ विवेकाची गोष्ट असो, धृतराष्ट्र ना ऐकल्यासारखे करतं गेले. ज्यावेळी राज्याच्या विभाजन करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी ओसाड हिस्सा पांडवांना दिला आणि सुपीक भाग आपल्या मुलांना दिला. ज्यावेळी भरलेल्या दरबारात दुर्योधनाच्या आदेशावरून द्रौपदीला अपमानित केले जात होते, त्यावेळी देखील धृतराष्ट्र आपल्या मुलाच्या मोहापायी आपला विवेक हरपून बसून राहिले. शेवटी धृतराष्ट्राला युद्धामध्ये दुर्योधनासमवेत आपल्या सर्व मुलांना गमवावे लागले. पुत्र मोहाच्या अतिपणामुळे धृतराष्ट्राचे नाव आज म्हणी मध्ये राहिले आहेत. आजदेखील आपल्याला आपल्या ओवतीभोवती धृतराष्ट्राच्या स्वभावाचे अनेक पिता सापडतील.
 
6 प्रह्लाद आणि हिरण्यकश्यपूची पितृ भक्ती : ही कथा हिरण्यकश्यपूची अगदी धृतराष्ट्राचा कथेच्या उलट आहे. आपल्या सामर्थ्याचा अभिमानामध्ये चूर असलेला हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजायला लागला होता. त्यांचा मुलगा प्रह्लादाने त्याला देव मानण्यास नकार दिला आणि विष्णूंची उपासना सुरूच ठेवली, तर तो स्वतःच्या मुलाच्या जीवानिशी आला आणि त्याला मारण्यासाठी षडयंत्र करत राहिला. त्याला त्यांचा कर्मांचे फळ तेव्हा मिळाले जेव्हा विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन त्यांचे वध केले. 
 
अशे अनेक उदाहरणांनी आपल्या पौराणिक कथा समृद्ध आहे ज्यामध्ये संबंधाच्या वेगवेगळ्या आयामामध्ये वडिलांचे महत्त्व दर्शवते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आसाममधील करीमगंज जिल्हा आता 'श्री भूमी' म्हणून ओळखला जाईल, हिमन्त बिस्वा सरमा यांची घोषणा

LIVE: रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

Hockey : भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला

विधानसभा निवडणुकीत झारखंड आणि महाराष्ट्रातून 1000 कोटी रुपये जप्त

पुढील लेख
Show comments