Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Essay on Independence Day : स्वातंत्र्य दिनावर निबंध

Essay on Independence Day
Webdunia
बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (19:52 IST)
स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांचा नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वतंत्र हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी म्हणतात 'पराधीन सपनेहुं सुखनाहीं' म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नात देखील सुख नसतं. गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते.

आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे. आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा देखील प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे. 

भारतवर्षातील महान संविधानाचे लेखक बाबा साहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांनी संविधानात भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रेची ओळख करून दिली आहे तसेच त्यांना विशेष अधिकार देखील दिले आहे. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या समृद्धीच्या उंचावर पोहोचला आहे. 

आज संपूर्ण जगात भारत आशेची किरण बनून सूर्यासम आकाशात चमकत आहे, हे सर्व स्वातंत्र्य भारतात शक्य आहे. पण आम्हाला हे स्वातंत्र्य सहजच मिळाले नाही, या साठी देशातील शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले आहे. आम्हाला त्याचे नेहमीच आभार मानायला हवे. 

आज आपण या स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, हे आपल्याला भारतमाताच्या वीर सपूतांची आठवण करून देते ज्यांनी आपल्या स्वतःला पूर्णपणे या देशासाठी अर्पण केले होते. भारतातील प्रख्यात विद्वान, कवी,  इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक उन्नती करून भारताच्या स्वातंत्र्यात चार पट वाढ केली.
 
आज भारत संपूर्ण जगात अविश्वसनीय आहे. सामाजिक कुरीती नाहीश्या झाल्या, गरिबांचे आर्थिक शोषण संपले आणि खेड्या गावांच्या स्थितीमध्ये देखील सुधारणा झाली. आज भारतासमवेत संपूर्ण जग दहशतवाद्यांशी झुंज देतं आहे. हे स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वात मोठा डाग आहे.
 
हे तर आपणा सर्वांना ठाऊक आहे की दहशतवादाला काहीच धर्म नसे. काही लोकं दहशवादाच्या नावाखाली अनेक निर्दोष लोकांना ठार मारतात, देशाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. याचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये सरकारी धोरण आणि देशाच्या संरक्षण यंत्रणेबद्दल संभ्रम होत. आपल्या सर्वांना हवं की या दहशतवादाच्या विरुद्ध एकमताने आणि एकत्रितपणे मिळून सरकारला सहयोग करावं.
 
खरं तर हे आमचे सौभाग्याचं आहे की आम्ही या भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. काही लोकं निव्वळ स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या देशाला भ्रष्टाचारात व्यापून देशातील भोळी भाबडी जनतेला दिशाभूल करीत आहे. आपल्याला एकत्र होऊन अश्या भ्रष्ट लोकांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि या भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन लवकरात लवकर केले पाहिजे.
 
भारतवर्षाला पूर्वी सारखे सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजायचा आहे, प्रत्येक भारतीयाला आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवं, तरच आपले देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. हेच आमचे उद्दिष्ट आहे.
 
भारत मातेचा विजय असो, आम्ही सर्व एक आहोत, वंदे मातरम् .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

या देशातील लोकही पीएम किसान सन्मान निधीचा फायदा घेत आहेत, १८१ 'मुस्लिम' लाभार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल

मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १७ बांगलादेशींना अटक, पोलिस तपासात गुंतले

LIVE: मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १७ बांगलादेशींना अटक

संविधान धोक्यात आहे...उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदे संतापले

श्रीलंकेचे नौदलाने समुद्रात मासेमारी करणारे ११ भारतीय मच्छीमार पकडले

पुढील लेख
Show comments