Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

Webdunia
रविवार, 19 मे 2024 (10:05 IST)
आयपीएल 2024 च्या 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. यासह फाफ डुप्लेसिसचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा या मोसमातील चौथा संघ ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात RCB नवव्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद पात्र ठरले होते.

या पराभवाने सीएसकेचा प्रवास संपुष्टात आला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावाच करता आल्या.
 
14 सामन्यांमध्ये सात विजयांसह, RCB पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.  संघाच्या खात्यात आता 14 गुण आहेत
 
कोलकाता 19 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राजस्थान आणि हैदराबादचे संघ आहेत, ज्यांच्या खात्यात अनुक्रमे 16 आणि 15 गुण आहेत. रविवारी राजस्थान आणि हैदराबाद संघ साखळी टप्प्यातील शेवटचे सामने खेळतील. आता या दोघांमध्ये अव्वल स्थानासाठी लढत होणार आहे.
 
19 षटकांनंतर, RCB ला पात्र ठरण्यासाठी 17 धावा हव्या होत्या तर सामना जिंकण्यासाठी 35 धावा हव्या होत्या. कर्णधार फाफ डुप्लेसिसने यश दयालवर विश्वास व्यक्त करत डावाच्या शेवटच्या षटकात चेंडू त्याच्याकडे सोपवला. पहिल्या चेंडूवर धोनीने फाइन लेगवर जोरदार शॉट खेळला आणि 110 मीटरचा षटकार मारला. आता संघाला पाच चेंडूत 11 धावांची गरज होती, पण पुढच्याच चेंडूवर धोनी स्वप्नील सिंगच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 

शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. आता संघाला तीन चेंडूत 11 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर शार्दुलने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेतली. आता चेन्नईला पात्र ठरण्यासाठी दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. जडेजा क्रीजवर पोहोचला. दयालने ओव्हरच्या शेवटच्या दोन्ही चेंडूंवर डॉट्स टाकले आणि जडेजाला एकही धाव करता आली नाही. यासह आरसीबीने हंगामातील सलग सहावा सामना जिंकला. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

सर्व पहा

नवीन

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

डकवर्थ-लुईस नियमाचे सह-निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

आशिया कपच्या वेळापत्रकात मोठा बदल,या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

डेव्हिड वॉर्नरचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

पुढील लेख
Show comments