Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डिझेल भडका सुरूच ; दोन दिवसानंतर पुन्हा डिझेल महागले

Webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (11:02 IST)
पेट्रोलियम कंपन्यांनी Petroleum companies शनिवारी आणि रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. आज सोमवारी पेट्रोलमध्ये कोणताही बदल केला नाही. तर डिझेलच्या दरात वाढ केली. चालू महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ७ जुलैपासून डिझेल १.११ रुपयांनी वाढले आहे. तर जवळपास २१ दिवस पेट्रोलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी २९ जून रोजी पेट्रोलमध्ये ५ पैशांची किरकोळ वाढ झाली होती.
 
इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार सोमवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये कायम असून डिझेलचा भाव ७९.८३ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ऐतिहासिक स्तरावर आहे. डिझेलचा भाव ८१.६४ रुपये असून पेट्रोल ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये असून डिझेल ७६.७७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ८३.६३ रुपये असून डिझेल दर ७८.६० रुपयांवर कायम आहे.
 
पेट्रोल आणि डिझेल Petrol and diesel दरवाढीवर गेल्या महिन्याच्या अखेरीस देशभरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कंपन्यांनी आठवडाभर इंधन दर स्थिर ठेवले होते. दरम्यान, जागतिक बाजारात देखील क्रूड ऑइलचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये यापूर्वी केलेल्या दरवाढीने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माल वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर करते. डिझेल दरवाढीने यापूर्वीच माल वाहतूकदारांचे कंबरडे मोडले असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दरवाढीचे संकेत दिले आहेत. मच्छिमार बोटींसाठी डिझेलचा वापर केला जातो. त्याशिवाय शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर डिझेलवरच चालतात. डिझेलमध्ये होत असलेली दरवाढ या घटकांचा खर्च वाढवणारी आहे. इंधन दरवाढीने येत्या काही आठवड्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
 
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला

LIVE: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

जानेवारीत मिळू शकते मोठी भेट, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार

RBI गव्हर्नर रुग्णालयात दाखल, चेन्नईमध्ये उपचार सुरू

पुढील लेख
Show comments