rashifal-2026

1 जानेवारी पासून बदलणार हे नियम जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 28 डिसेंबर 2024 (17:47 IST)
Rule Change From 1st january:नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहे. 1 जानेवारी पासून नवीन वर्ष सुरु होणार आहे. हे नवीन वर्ष आपल्या सोबत काही नवीन नियमांना घेऊन येणार आहे हे नियम तुमच्या जेबवर काय असर करणार जाणून घेऊ या.

LPG पासून UPI मध्ये बदल 
देशात दर महिन्याला अनेक आर्थिक बदल दिसून येतात. केवळ नवीन महिनाच नाही तर नवीन वर्ष देखील 1 जानेवारी पासून सुरु होत आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून देशात पाच मोठे बदल होणार आहे. सर्वप्रथम एलपीजी सिलिंडर आणि हवाई इंधनाच्या किमतीत सुधारणा होणार आहे. कारण तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी बदल करतात. 

तसेच UPI 123 pay पेमेन्टचे नियम देखील 1 जानेवारी पासून लागू होणार आहे. EPFO पेन्शनधारकांसाठी आणलेला नवीन नियम या दिवसांपासून लागू होणार आहे. शेतकऱ्यांना दिलेले कर्ज देखील या मध्ये समाविष्ट आहे. चला हे कोणते बदल आहे जाणून घेऊ या.
 
1एलपीजीच्या किमती: 
दर महिन्याच्या 1 तारखेला तेल विपणन कंपन्या घरगुती आणि कमर्शिअल गॅसच्या किमतीत बदल करतात. गेल्या काही काळांपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल केले आहे. मात्र घरगुती 14 किलोच्या सिलिंडरच्या किमती स्थिर आहे. आता या 1 तारखेला सिलिंडरच्या किमतीत काय बदल होणार हे लवकरच कळेल.
 
2 EPFO चा नवा नियम -
या 1 तारखे पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO कडून पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाईल. ही त्यांच्यासाठी मोठी भेट आहे. या अंतर्गत पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रकम काढू शकतील. या साठी त्यांना कोणत्याही पडताळणीची गरज नसेल. 
 
3 UPI 123Pay
UPI 123Pay चे नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फीचर फोनद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा देण्यासाठी सुरू केले होते. त्याची व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल येत्या 1 तारखे पासून सुरु होणार आहे. आता युजर्स 10 हजार रुपयांपर्यन्तचे ऑनलाईन पेमेंट करू शकतील. पूर्वी ही मर्यादा 5 हजार रुपये होती. 
 
4 शेअर बाजाराच्या नियमांमध्ये बदल -
सेन्सेक्स, सेन्सेक्स 50 आणि बँकेक्सवरून मासिक एक्स्पायरीपर्यंत बदल करण्यात आले आहे. आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार असून त्रेमासिक आणि सहामासीक करार शेवटच्या मंगळवारी संपणार असून NSE निर्देशांकाने निफ्टी 50 मासिक करार साठी गुरुवार निश्चित केला आहे. 
 
5 शेतकऱ्यांना कर्ज- 
या 1 तारखे पासून शेतकऱ्यांना आरबीआय कडून हमीशिवाय रुपये 2 लाखांचे कर्ज मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नववे अर्थसंकल्प सादर करणार

बजेटपूर्वीच व्यावसायिक गॅस सिलिंडर महागले, नवीन दर जाणून घ्या

LIVE: सुनेत्रा पवार फडणवीस मंत्रिमंडळात तीन महत्त्वाची खाती सांभाळतील

देशातील पहिले वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र महाराष्ट्रात सुरू, मुख्यमंत्री फडणवीस आणि माजी सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्घाटन

IND vs NZ: सूर्यकुमार यादवने T20I मध्ये विश्वविक्रम रचला

पुढील लेख
Show comments