Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मीरमधून पलायनाची वेदनादायक कहाणी, काश्मिरी पंडितांच्या तोंडी KashmirFIles

स्मृति आदित्य
मंगळवार, 15 मार्च 2022 (18:01 IST)
प्राणेश नागरी, साहित्यकार (काश्मिरी पंडित)
 
असे पहिल्यांदा घडलं की त्या सत्यावर चित्रपट निर्मिती झाली आहे ज्याबद्दल कुणालाही ऐकण्यात आणि जाणून घेण्यात रस नव्हता... हे चित्रपट नव्हे तर डिजिटल डॉक्यूमेंटेशन ऑफ जेनोसाइड आहे. पहिल्यांदा आमच्या जीवनातील सत्य इतक्या जोमाने स्थापित करण्याचा प्रयत्न केले गेला आहे. आमची संपूर्ण जात संपवण्याचा प्रत्यन केला गेला. कश्मीरी पंडित हेच भारत आणि कश्मीर यांच्यात सेतु होते. म्हणूनच आमच्या संस्कृतीला नष्ट केलं गेलं. ते म्हणतात ना की जेव्हा आपण एखाद्या संस्कृतीला नष्ट करतो तेव्हा त्याचं भविष्य देखील संपवतो. आमच्या कश्मीरी पंडितांची आपली समृद्ध, संपन्न, वैभवशाली आणि यशस्वी संस्कृती होती... जरा स्मरण असू द्या की राजतरंगिणी कुठून आली, कल्हण, बिल्हण कोण होते? ही आमच्या साहित्य आणि संस्कृतीच्या विद्वान ऋषींची वैभवशाली भूमी आहे...
 
आम्ही सगळ्यांकडे जाऊन आमची कैफियत मांडली, पण ऐकलं कुणी, पहिल्यांदाच आमची यादी केली जात आहे, पहिल्यांदाच आमच्या अस्मितेचं संकट दूर करण्यासाठी उपाय शोधले जात आहेत....KashmirFIles मध्ये जे दर्शवण्यात आले आहे, जे बघून सर्व घाबरत आहेत, ओरडतं आहे.... पण आम्ही ते सर्व बघितलं आणि भोगलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आमची याचिका फेटाळून लावली.. आम्ही काय करायचे? आपण सांगा....?
 
माझ्या आईने आपल्या शेवटच्या काळात मला म्हटलं होतं की माझा देहावर कश्मीरमध्ये संस्कार करा, मी विचारले आपण असे का म्हणतं आहात तर त्यांनी म्हटले की तेथील आग आज विझली आहे.. कल्पना करा की हे ऐकून मुलाला कसे वाटले असेल? माझी तिथे दोन घरं आहेत, आता तिथे कोण राहतं ते मला माहीत नाही? माझ्याकडे किमान 100 एकर जमीन होती ज्यावर फळांच्या बागा होत्या....माझी बायको तिथून फक्त एक जोड कपडे घालून आली होती, तेही वलून होते, कानपूरच्या उन्हात आमच्याकडे ते बदलायलाही पैसे नव्हते. 7-8 महिने कपडे बदलले नाहीत. 48 डिग्री तापमानात त्या कपड्यांतून तिच्या अंगातून रक्त वाहू लागले. आमच्याकडे कोणी पाहिले, आमचे कोणी ऐकले? आज विवेक अग्निहोत्रीने किमान चित्रपटाच्या माध्यमातून देशातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे धाडस केले आहे.
 
हे सरकार पहिल्यांदाच आमची ओळख पुनर्संचयित करण्यासाठी आणि सत्य प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे. KashmirFIles बनवून विवेक रंजन अग्निहोत्री यांनी इतिहास रचला आहे. आज आपण स्वतःलाच विसरत चाललो आहोत, शिवरात्री कशी साजरी करायचो हे माझ्या मुलाला माहीत नाही, शैव्य शास्त्र काय आहे, त्याला माहीत नाही...
 
त्यावेळी एकच आवाज, सर्व काश्मिरी पंडितांनी येथून पळून जावे आणि आपल्या बायका येथे सोडाव्या, अशी परिस्थिती होती. विचार करा, एखाद्या मारुन त्याच्या चारीबाजूला नाचण्याची प्रवृत्ती याला आपण काय म्हणाल? कोणता धर्म राक्षसी प्रवृत्तीची शिकवण देतो? या चित्रपटातील प्रत्येक नाव बरोबर आहे, प्रत्येक गोष्ट बरोबर आहे. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य बरोबर आहे, खरी नावे इतक्‍या सत्यासह उघड करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल मी विवेक अग्निहोत्री यांना विनम्र अभिवादन करतो.
 
दुर्बल मनाच्या लोकांसाठीही हा चित्रपट पहण्यासारखा आहे कारण काश्मीर हे भारताचे स्वर्ग आहे, त्याच स्वर्गात काश्मिरी पंडितांनी ज्या नरकाचा सामना केला आहे... ते पाहण्यासाठी चित्रपट पहा... यात दाखवण्यात आले आहे की जेनोसाइड कोणाला म्हणतात... आपली एक-एक नस्ल नष्ट करण्यात आली... 32 वर्षांपासून एक कश्मीरी पंडित म्हणत आहे की माझं ऐका, मी देखील याच देशाचा भाग आहे, 4000 लोकांचा खून झाला, साडे सात लाख लोक तेथून निघून देशातील इतर भागांमध्ये विखुरले.... एक ना एक दिवस आपण सगळेच संपुष्टात येणार... आपल्या आयुष्यात काय उरणार आहे? कधी ऐकणार आमचं, कसं बाहेर पडणार आमच्या ह्रदयातील ते भयावह दृष्य....
 
नदी मर्ग हे काश्मीरमधील एक ठिकाण आहे जिथे 28 काश्मिरी पंडित राहतात, त्यांना एका रांगेत उभे करुन मारलं जातं आणि जेव्हा एक मूल त्याच्या आईच्या मृत्यूमुळे रडतो तेव्हा दहशतवादी म्हणतो हा आवाज कुठून येत आहे आणि त्यालाही गोळी मारण्यात येते... हा रानटीपणाचा कळस आहे, तिथे विचाराच्या पातळीवरही जाता येत नाही. हा चित्रपट बघा, बघितला नाही तर कसं समजणार, कसं कळणार? झिरो ग्राउंड रिअ‍ॅलिटी म्हणजे काय हे कसे जाणून घ्याल? ते शब्दात कसे मांडता येणार जे या दृश्यांनी विचलन निर्माण केले आहे... जे दाखवले आहे ते फक्त 2 ते 3 टक्के आहे, अनेक पटींनी आपल्या हृदयात कोरलेले आहे.... आपण जे अनुभवले, भोगले त्याच्या जखमा आजही आपल्या हृदयात आहेत आणि राहतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments