rashifal-2026

मास्कचा फॅशन फंडा

Webdunia
गुरूवार, 16 जुलै 2020 (14:01 IST)
सध्या मास्कचा जमाना आहे. मास्क घातल्याशिवाय बाहेर जाताच येत नाही. मास्कमुळे चेहर्‍याचा अर्धा भाग झाकला जातो. अर्थात या मास्कसोबतही तुम्ही फॅशनेबल राहू शकता, दिसू शकता. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळतात. तुम्ही घरीही छानसं मास्क बनवू शकता. पेहरावानुसार मास्कची निवड करा आणि फॅशनचं गणित चटकन सोडवा. मास्कसोबत फॅशनेबल दिसण्यासाठी काय करायला हवं याबाबतच्या काही टिप्स...
* सर्जिकल मास्क मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. हे मास्क कोणत्याही कपड्यांसोबत शोभून दिसतात. भारतीय तसंच पाश्चिमात्त्य पेहरावासोबत तुम्ही सर्जिकल मास्क कॅरी करा. त्यातही साडी, सलवार कमीझ अशा पारंपरिक भारतीय पेहरावांसोबत सर्जिकल मास्क शोभून दिसतात. भारतीय पेहराव केला असेल तर शक्यतो निळ्या रंगाचं मास्क लावा. वेस्टर्न वेअरवर पांढरं मास्क खुलून दिसेल.
* एन-95 मास्कही लोकप्रिय आहेत. यामुळे कोरोना विषाणूसह प्रदूषणापासूनही बचाव होतो. हे मास्क चंकीफंकी कपड्यांसोबत खुलून दिसतात. जॉगर्स, एक्सरसाईज पँट, शॉर्टस्‌, रिप्ड जीन्स, पुलओव्हर घातले असतील तर एन 95 मास्क लावा. या मास्कमुळेतुम्हाला कॅज्युअल लूक मिळेल.
* कॉटन प्रिंटेड मास्कही उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या रंगांचे, प्रिंट्‌सचे हे मास्क खूप छान दिसतात. भारतीय पेहरावासोबत कॉटन मास्क कॅरी करा. सारा अली खाननेही सलवार कमीझवर छानसं कॉटन मास्क घातलं होतं.
* तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं काळ्या रंगाचं मास्क असेल तर ते कॅज्युअल प्रसंगी वापरा. जीन्स, टी शर्ट, पलाझो, केप्रीवर ब्लॅक मास्क घालता येईल. निऑन रंगांच्या पेहरावासोबत ब्लॅक मास्क शोभून दिसेल. तुम्ही फुल ब्लॅक लूकही कॅरी करू शकता.
 श्रीशा वागळे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे धोकादायक ठरू शकते, हे घरगुती उपाय करा

लघु कथा : दोन बेडकांची गोष्ट

हिवाळयात भाज्यांची ग्रेव्ही लवकर घट्ट होते का? हे सोपे उपाय वापरून पहा

आयलाइनर जास्त काळ टिकवायचे आहे, या टिप्स अवलंबवा

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments