rashifal-2026

काय सांगता,रक्त साकळणे देखील धोकादायक असू शकत

Webdunia
बुधवार, 31 मार्च 2021 (16:43 IST)
कधी कधी रक्त साकळणे देखील चांगले मानले जाते. याचे कारण असे की दुखापत झाली असेल तर रक्त साकळल्यामुळे शरीरातील रक्तस्त्राव कमी होतो. तरी रक्त साकळणे हे धोकादायक असू शकते. रक्त साकळणे म्हणजे शरीरात रक्ताचा गुठळ्या होणं. या गुठळ्या रक्ताचा प्रवाह रोखतात. त्यामुळे मृत्यूचा धोका संभवतो. जर आपल्या शरीरात देखील रक्ताचा गुठळ्या होतात किंवा रक्त साकळते तर या लक्षणांकडे दुर्लक्षित करू नका.  
 
1 हातावर किंवा पायावर सूज येणं- हात आणि पायावर सूज येत असेल तर या कडे दुर्लक्ष करू नये.वारंवार असं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
2 त्वचा लालसर होणे- जर हातात किंवा पायात वेदनेसहसूज आहे आणि त्वचेचा रंग गडद लाल किंवा निळा झाला असेल तर हे रक्त साकळण्याचे संकेत असू शकतात. या कडे दुर्लक्षित करू नका. हे धोकादायक असू शकतात. 
 
3  छातीत वेदना होणं- प्रत्येक वेळा छातीत दुखायचे कारण म्हणजे हार्ट अटॅक नसून फुफ्फुसाच्या एम्बोलिझमचे लक्षण देखील असू शकते. यामध्ये रक्ताच्या गुठळ्या फुफ्फुसांमध्ये जमा होतात. वास्तविक, त्यात खूप वेदना होत आहे आणि श्वास घेताना वेदना वाढते. अशा परिस्थितीत त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  
 
4 श्वास घेण्यास त्रास होतो - हे एक गंभीर लक्षण आहे जेव्हा फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या होतात. तर ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि या मुळे श्वास घेण्यास त्रास होतो. आपल्याला देखील ही सर्व लक्षणे आढळली तर आपण त्वरितच वैद्यकीय परामर्श घ्यावा.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

या देशात १,२०० हून अधिक प्रकारचे चीज खाल्ले जाते

Fruit Chaat Recipe उपवासासाठी बनवा पौष्टिक फ्रुट चाट

लहान मुलांसाठी १० हेल्दी स्नॅक्स: पौष्टिक आणि मुलांना आवडतील असे पदार्थ

बजेटमध्ये स्टायलिश दिसा: कमी खर्चात चांगले कपडे आणि ॲक्सेसरीज कसे निवडावे

खंडोबाच्या नावावरून मुलांसाठी नावे

पुढील लेख
Show comments