Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Benefits Of Tomato Juice आरोग्यासाठी फायदेशीर टोमॅटो रस

Webdunia
मंगळवार, 8 जून 2021 (19:18 IST)
टोमॅटोचा वापर अन्नाची चव वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध  हे आरोग्यासाठी आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे. टोमॅटोच्या रसाचे नियमित सेवन केल्याने आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही मिळवले जाऊ शकते.टोमॅटो सुंदर त्वचेची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.बरेच लोक टोमॅटोला सॅलड रूपात खाणे पसंत करतात.आम्ही सांगू इच्छितो की दररोज टोमॅटोचे ज्यूस प्यायल्याने त्वचेचे आजार बरे होतात.चेहऱ्यावर चमक येते.
 
टोमॅटो ज्यूस पिण्याचे फायदे-
 1 अपचनाचा त्रास असल्यास टोमॅटोच्या ज्यूसमध्ये सेंधव मीठ आणि सुंठपूड मिसळून प्यायल्याने अपचनाच्या त्रासात आराम मिळतो.
 
2 टोमॅटोच्या ज्यूसमध्ये काळीमिरपूड आणि वेलचीपूड मिसळून सेवन केल्याने जीव घाबरणे आणि मळमळ मध्ये आराम मिळतो.
 
3 टोमॅटोच्या ज्यूसचे दररोज सेवन केल्याने पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो.
 
4 टोमॅटोच्या सुपात काळीमिरपूड घालून नियमितपणे प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा समस्येपासून आराम मिळतो.तसेच चेहऱ्यावरील चमक आणि ऊर्जा टिकून राहते.
 
5 कफ,खोकला झाला असल्यास टोमॅटोच्या सुपात काळीमिरपूड घाला किंवा लाल तिखट घालून दररोज गरम प्यायल्याने कफ,खोकला श्लेष्माच्या त्रासापासून आराम मिळतो.
 
* टोमॅटोचे त्वचेसाठी फायदे-
* टोमॅटो त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो.याच्या सेवनाने चेहऱ्याच्या सुरकुत्या देखील दूर होतात.हे त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवतो,जे त्वचेवर रेषा आणि सुरकुत्या होण्याचे प्रमुख कारण आहे.
 
* टोमॅटो चे ज्यूस त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. मुरुमांच्या समस्येपासून त्रस्त आहात तर टोमॅटो चे सेवन केल्याने आणि हे चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.
 
* एक चमचा टोमॅटोच्या रसात अर्धा चमचा हरभराडाळीचे पीठ आणि मलई मिसळून लावल्याने चेहऱ्यावर चमक येते.
 
* टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने रक्त स्वच्छ होते आणि चेहरा चमकतो.
 
* नियमितपणे टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते.
 
 
 

संबंधित माहिती

नेपाळमध्ये राजकीय गट आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संघर्ष

हिथ्रो विमानतळावर दोन विमानांची टक्कर, कोणतीही दुखापत नाही

Chess: आर प्रज्ञानानंद हा देशबांधव डी गुकेशकडून पराभूत

दक्षिण-पश्चिम सीरियामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात मुले ठार

भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव

रोज जेवणात सेवन करत आहात का तिखट हिरवी मिर्ची, जाणून घ्या नुकसान

Love Tips : डेटवर जातांना करू नका या चुका

पाण्याची कमी नाही तर, 5 पोषकतत्वांचा अभाव असल्यास फाटतात ओठ

Career Tips: टनल इंजिनिअर बनून कॅरिअर बनवा, दरमहा लाखो कमवा

बनावट तांदूळ असे ओळखावे

पुढील लेख
Show comments