Dharma Sangrah

वजन कंट्रोल करण्यासाठी या फायबरयुक्त भाज्यांचे नियमित सेवन करा

Webdunia
सोमवार, 15 सप्टेंबर 2025 (07:00 IST)
सध्या बदलत्या जीवनशैली मुळे लहान वयातच शुगर, बीपी, सारखे आजार होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. फास्टफूड जंक फूड खाल्ल्याने शरीराला आजार होतात. जेवणात संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी राहते. जंक फूड खाऊन वजन वाढते.
ALSO READ: आहारात या 7 गोष्टींचा समावेश केल्याने हार्मोनल असंतुलनाची समस्या दूर होईल
आपल्या अन्नात फायबर पचनक्रिया निरोगी ठेण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे वजन नियंत्रित ठेवतात. आहारात फायबरयुक्त आहाराचा समावेश करावा. फायबरयुक्त आहार खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. हे वाढत्या वजनावर देखील नियंत्रण ठेवते. या फायबरयुक्त भाज्यांचा आपल्या आहारात नियमित समावेश करावा.
 
काकडी-
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्याशिवाय त्यात भरपूर फायबर असते. हे खाल्ल्याने जास्त भूक लागत नाही. वजन कमी करण्याच्या आहारात तुम्ही काकडीचा  सहज समावेश करू शकता. सालासह काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
 
मटार-
हिरव्या वाटाण्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. तुम्हाला हवे असल्यास, मटार ची भाजी, पराठा किंवा टिक्कीमध्ये देखील समाविष्ट करू शकता.
ALSO READ: मायग्रेन दरम्यान कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत जाणून घ्या
पालक-
पालक हा पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात लोह, फायबर आणि इतर अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे खाल्ल्याने मलप्रक्रिया सुलभ होते आणि पचनक्रियाही निरोगी राहते.
ALSO READ: चिया बिया तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात, या चुका करू नका
ब्रोकोली-
ब्रोकोली फायबरचा समृद्ध स्रोत आहे. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही त्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता. तुम्हाला हवे असल्यास ब्रोकोलीचा समावेश सॅलडमध्ये करून खाऊ शकता किंवा भाजी आणि भातासोबत शिजवू शकता.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

अर्धा कापलेला लिंबू आता खराब होणार नाही; स्टोर करण्यासाठी या पद्धती वापरा

घरी आलेल्या पाहुण्यासाठी अशा प्रकारे बनवा पौष्टिक शाही भिंडी रेसिपी

हिवाळ्यात सर्दी तापावर हे घरगुती उपाय अवलंबवा

पॅरामेडिकल अभ्यासक्रम मध्ये कॅरिअर करा

चेहऱ्यावर चमक मिळवण्यासाठी टोमॅटोचा वापर करा

पुढील लेख
Show comments