Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळा आला, सातूचे 10 मौल्यवान फायदे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 20 मे 2020 (06:43 IST)
उन्हाळाच्या दिवसात सातू (सत्तू) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. सातू यूपी आणि बिहार मध्ये प्रचलित आहे. या ठिकाणी सातूचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनविले जातात. सातू आवडण्याचे कारण त्याची चवच नव्हे तर आरोग्याशी निगडित फायदे देखील आहेत. जाणून घेऊया सातूचे फायदे....... 
 
1 उन्हाळ्यात सातूचे सेवन केल्याने आपण उष्माघात आणि उष्णतेपासून वाचू शकता. सातूच्या सेवनामुळे उष्माघात होण्याची शक्यता कमी होते आणि शरीरात थंडावा जाणवतो.
 
2 आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागत असल्यास किंवा भूक सहन होत नसल्यास सातू आपल्यासाठी फायदेशीर आहे. हे खाऊन किंवा याचा सरबताचे सेवन केल्यावर आपल्याला भुकेचा त्रास जाणवणार नाही.
 
3 सातू हा प्रथिनांचा स्रोत आहे. पोटाच्या सर्व त्रासाला दूर करून पोटदुखीला बरे करतो. सातू खाल्ल्याने यकृत बळकट होतो. ऍसिडिटीच त्रास दूर होतो. सहज पचन झाल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
 
4 जव आणि हरभऱ्यापासून बनवलेले हे सातू मधुमेहासाठी फायदेशीर असतं. आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास दररोज सातूचे सेवन केल्याने फायदा होईल. सातू पाण्यात घोळून सरबत बनवून घ्यावे किंवा मीठ घालून देखील घेऊ शकता.
 
5 शरीरात थकवा जाणवल्यास सातू खाल्ल्याने ऊर्जा मिळते. अशक्तपणा दूर करून आपल्याला उत्साही ठेवण्यास प्रभावी आहे. यामध्ये बरेच पौषक घटक आढळतात जे आपल्याला पोषण देतात.
 
6 अंगाची जळजळ कमी करतं. पाण्यात घोळून प्यायल्याने शरीरामधील पाण्याची कमतरता दूर होते. तहान पण शमते.
 
7 सातूच्या सेवनाने गळ्याचे आजार, ओकार्‍या, डोळ्यांचे आजार आणि इतर आजार बरे होतात.
 
8 ह्यात असलेले प्रथिनं स्नायूंना बळकट करतात.
 
9 लठ्ठपणाने त्रासलेल्या लोकांसाठी सातू हा रामबाण उपाय आहे. जव पासून बनवलेले सातू दररोज खाल्ल्याने पचनसंस्था सुरळीत काम करते. लठ्ठपणा कमी होऊन सडपातळ अंगकाठी मिळवू शकता.
 
10 रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी सातू खाणे फायदेशीर असतं. या साठी सातूमध्ये लिंबू, मीठ, जिरं आणि पाणी मिसळून प्यावं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

Health Benefits of Broccoli : ब्रोकोली हिवाळ्यातील सुपर फूड आहे फायदे जाणून घेऊया

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

पुढील लेख
Show comments