Dharma Sangrah

मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला

Webdunia
मुली येतात माहेरी 
आपल्या मुळांना प्रेमाचा ओलावा द्यायला.... 
 
त्या येतात भावांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला....  
त्या येतात आपलं लहानपण शोधायला....
 
त्या येतात अंगणात स्नेहाचा दीपक ठेवायला....
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....
 
मुली येतात काळा दोरा दारावर बांधायला....
कुणाची द्रुष्ट लागु नये म्हणून आपल्या घराला.... 
 
त्या येतात मायेच्या झऱ्याखाली स्नान करायला....
त्या येतात सगळ्यांना आपलं थोडं-थोडं प्रेम द्यायला.... 
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....
 
मुली जेव्हा परत जातात सासरी....
बरंच काही जातात सोडून त्या आपल्या माहेरी....
तीचे गोड हसणें आठवले कि नकळत....
सर्वांचे डोळे होतात ओले काठावरी.... 
 
जेव्हाही मुली येतात आपल्या माहेरपणाला....
खरंतर त्या येतात आपल्या प्रेमाच्या वैभवाची उधळण करायला....
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....
 
♻ खूप चंचल, खूप आनंद देणाऱ्या असतात ह्या मुली....
♻ नाजूक मनाच्या आणि भोळ्या असतात ह्या मुली....
♻ छोट्या - छोट्या गोष्टी वर रडणाऱ्या....
♻ खूप निष्पाप असतात ह्या मुली....
♻ प्रेम वात्सल्य भरभरून असणाऱ्या देवाची देणगी असतात ह्या मुली....
♻ घर कसं प्रफुल्लीत होतं, जेव्हा हसतात ह्या मुली....
♻ काळजाचं पाणी होतं तेव्हा....
♻ लग्न होऊन जेव्हा दुसऱ्या घरी जातात ह्या मुली....
♻ खूप एकटं - एकटं वाटतं किती रडवुन जातात ह्या मुली....
♻ आनंदाच प्रतीक आई बाबांच्या खूप लाडक्या असतात ह्या मुली....
♻ हे मी नाही म्हणत....
♻ हे तर साक्षात देव म्हणतो कि....
♻ मी जेव्हा खूप प्रसन्न असतो तेव्हा जन्म घेतात ह्या मुली....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धुरंधर' 500 कोटी क्लबमध्ये सामील, 16व्या दिवशी शाहरुख खानचा विक्रम मोडला

Perfect places for adventure lovers पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी भारतातील परिपूर्ण ठिकाणे

Flashback : २०२५ मध्ये रवीना टंडनची मुलगी राशापासून ते सैफचा मुलगा इब्राहिमपर्यंत, या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मालिकेत का घेतली लीप? एकता कपूरने सांगितली कथानक बदलाची निकड

बेटिंग अॅप प्रकरणात सेलिब्रिटींविरुद्ध ईडीची मोठी कारवाई

पुढील लेख
Show comments