Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधुनिक मूर्खलक्षणे

Webdunia
गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (12:52 IST)
चालत्या वाहनावरी 
हेडफोन कानी धरी 
गाणी ऐकत जाय घरी 
तो एक मूर्ख ||
 
रुग्णालयी वा सभागारी 
सूचना असली तरी 
मोबाईल बंद न करी
तो एक मूर्ख ||
 
कामधंदा कधी ना करी 
अभ्यास व्यायाम ना करी 
रात्रंदिन फोन ज्याचे करी
तो एक मूर्ख ||
 
जिथे तिथे सेल्फी काढतो 
श्र्लील अश्लील भेद न करतो 
आलेला संदेश ढकलतो 
तो एक मूर्ख ||
 
घरुन जाता बाजारी 
कापडी थैली ठेवी घरी 
पॉलिथिनची हाव धरी 
तो एक मूर्ख ||
 
जाता स्वरुचीभोजनी
अन्न घेई भरभरोनी
थोडे खाऊन देई टाकोनी
तो एक मूर्ख ||
 
वाहतूकीचे नियम न पाळणे 
रस्त्यावरी कचरा टाकणे 
ऐसी ज्याची अवलक्षणे 
तो एक मूर्ख ||
 
दिली वेळ न पाळतो 
लोकांचा खोळंबा करतो 
खंतखेदही ना मानतो 
तो एक मूर्ख ||
 
ऐसी मूर्खलक्षणे असती
जी समर्थ समयी नसती
विनायके वर्णिली असती 
त्यागार्थ यथामती ||

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

वायलेंट हिरो' चा काळ: ताहिर राज भसीन

पुढील लेख