Dharma Sangrah

बॅग कशी भरायची

Webdunia
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (12:47 IST)
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
फापट पसारा आवरून सारा, 
आता सुटसुटीत व्हायचं  आहे  !
 
याच्या साठी त्याच्या साठी, 
हे हवं, ते हवं 
इथे तिथे - जाईन जिथे, 
तिथलं काही नवं  नवं 
हव्या हव्या चा हव्यास आता 
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, 
बॅग हलकी स्वतः पुरती 
आता फक्त ठेवायची आहे ! 
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे ! 
 
अपेक्षांच्या ओझ्याखाली 
आजवर त्रस्त होतो 
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये 
काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होतो 
काय राहिलं, कुठे ठेवलं 
आठवून आठवून पाहत होतो 
त्या त्या वेळी ठीक होतं 
आता गरज सरली आहे, 
कुठे काय ठेवलंय ते ते 
आता विसरून जायच आहे 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
 
खूप जणांनी खूप दिलं 
सुख दुखाःचं भान दिलं 
आपण कमी पडलो याचं 
शल्य आता विसरायचं आहे !
 
मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
 
आत बाहेर काही नको 
आत फक्त एक कप्पा, 
जना - मनात एकच साथी 
सृष्टी करता एकच देवबाप्पा ! 
 
सुंदर त्याच्या निर्मिती ला 
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत 
अलगद उठून जायचं आहे 
 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रणवीर सिंगच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

देसी गर्ल प्रियांका चोप्राने पांढऱ्या लेहेंग्यात आकर्षक शैलीत पोज दिली

राम माधवानी यांच्या आध्यात्मिक अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये टायगर श्रॉफ दिसणार वेगळ्या अवतारात

४३ वर्षीय दक्षिणेतील अभिनेत्रीने तिसऱ्यांदा घेतला घटस्फोट

रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला हे पतीची पत्नी और पंगा सीझन 1 चे विजेते ठरले

सर्व पहा

नवीन

रोनित रॉयने त्याच्या कुटुंबासाठी उचलले मोठे पाऊल, महत्त्वाची माहिती शेअर केली

Dharmendra Facts धर्मेंद्र यांच्याबद्दल ५० तथ्ये जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

एका युगाचा अंत: करण जोहरने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली, भावनिक पोस्ट शेअर केली

धर्मेंद्र यांचे निधन, सनी देओल यांनी केले अंत्यसंस्कार, श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचले

पलाश मुच्छल यांची प्रकृती बिघडली, तपासणी नंतर सोडले

पुढील लेख
Show comments