Marathi Biodata Maker

शेअर बाजारात प्रचंड उत्साह, निफ्टी १०,३०० वर

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (16:26 IST)

सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुरू केलेल्या घोषणेने शेअर बाजारात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. तब्बल ४५० अंकांनी निर्देशांक वधारला आणि ३३,०८६ वर पोहोचला. निफ्टीनेही १०,३०० अंक पार करत नवा विक्रम केलाय. 

वाढत्या बुडीत कर्जाचा तिमाहीतील नफ्यावर विपरीत परिणामांची नोंद करणाऱ्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता केंद्र सरकारने घसघशीत अर्थसाहाय्य देऊ केलेय. याअंतर्गत बँकांना येत्या दोन वर्षांकरिता २.११ लाख कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी घेतलेल्या निर्णयामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्जपुरवठा क्षमता आता भक्कम होईल, असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे याचा परिणामही दिसून येत आहे.  बँकिंग क्षेत्रातील निफ्टी २.३ टक्क्यांनी वाढून २४,७८० स्तरावर गेला. निफ्टीचा पीएसयू बँक इंडेक्स २२ टक्क्यांसह मजबूत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पुढील ६ महिने शासकीय सोहळ्यांना ब्रेक! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय काटकसरीवर भर

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

Monsoon 2026: १६ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश; या राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी

हिंगणघाटमध्ये भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments