Festival Posters

Bitter Gourd Pickle हे लोणचं नुकसान नाही करणार, आजच घाला कारल्याचे लोणचे रेसिपी

Webdunia
शनिवार, 12 जुलै 2025 (17:56 IST)
साहित्य-
500 ग्रॅम कारले
अर्धा कप मोहरीचे तेल
चार चमचे पिवळी मोहरी
दोन चमचे जिरे
दोन चमचे मेथीचे दाणे
1/4 टीस्पून हिंग  
एक टीस्पून ओवा
तीन चमचे मीठ
एक चमचा हळद  
अर्धा टीस्पून तिखट
1/4 टीस्पून गरम मसाला
अर्धा टीस्पून बडीशेप पूड
1/4 टीस्पून काळे
ALSO READ: लिंबू-आल्याचे लोणचे रेसिपी
कृती-
कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी सर्वात आधी कारले धुवून स्वच्छ करून घ्यावे. तुमच्या आवडीनुसार कारल्याचे लांब किंवा लहान तुकडे करा. आता एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करावे. आता त्यामध्ये  मोहरी, जिरे, मेथी आणि हिंग घालून परतून घ्या. आता हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि बडीशेप पावडर घालून परतून घ्या. तसेच कढईत चिरलेले कारले घालावे. आता मीठ घालावे. तसेच शिजवून घ्यावे. कारले मऊ झाल्यानंतर पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. थंड झाल्यावर त्यात काळे मीठ घालावे. नंतर लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरावे आणि झाकण घट्ट बंद करावे. आता रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ शकतात. तर चला तयार आहे आपले कारल्याचे लोणचे रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

शरीरात झिंकच्या कमतरताची लक्षणे, जाणून घ्या

सिनेमॅटोग्राफर मध्ये करिअर बनवा

सैल त्वचा घट्ट करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

प्रेरणादायी कथा : तीन पर्वतांची गोष्ट

Moong Dal Chilla पौष्टिक आणि चविष्ट मुगाच्या डाळीचे धिरडे

पुढील लेख
Show comments