suvichar

गदर केलाय आम्ही गद्दार नाही : एकनाथ शिंदे

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (08:21 IST)
गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यात बोलत होते.
 
“आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे,” असे एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
 
“बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं, ते शिवसैनिक कधीही विसरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केल आहे, त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला,” असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची (DA) थकबाकी मे महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला

नवी मुंबई विमानतळाला 'दि. बा. पाटील' यांचे नाव देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली; "नाव देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही," असे कोर्टाने स्पष्ट केले

पेट्रोल वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला; मंत्री आता ऑनलाइन मंत्रिमंडळ बैठका घेणार

आई की वैरीण! आठ महिन्यांच्या चिमुकलीला पाजले ॲसिड, प्रकृती गंभीर

शेतकरी कर्जमाफी योजना आचारसंहितेमुळे रखडली, बळीराजा'मध्ये व्यापक असंतोष निर्माण

पुढील लेख
Show comments