Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये स्थायी समितीची बैठक संपताच एसीबीकडून छापा

Webdunia
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (10:46 IST)
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समितीची बैठक संपताच छापा मारला. यात महापालिकेतील स्थायी समिती कार्यालयाचा एसीबीने ताबा घेतला आहे. तर, एसीबी कडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महापालिकेत एकच खबळबळ उडाली आहे.
 
याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे, ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया (लिपिक), राजेंद्र जयंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भीमराव काळे (शिपाई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
 
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या जागेमध्ये होर्डींग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या २८ निविदा मंजुर झालेल्या होत्या. परंतु त्यांची वर्कऑर्डर न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले. तेव्हा, वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी च्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाऊंट) ३ टक्के रक्कम म्हणजे १० लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ टक्केप्रमाणे सहा लाख रूपये घेण्याचे मान्य झाले. ६ लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी आज तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता २ टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक – विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई, अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारल्यावर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: सोमवार 2 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

'देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री', शपथविधीपूर्वी नागपुरात लावले पोस्टर्स

आज महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा! फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब की आश्चर्यचकित चेहऱ्याची होणार एन्ट्री

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

पुढील लेख
Show comments