Marathi Biodata Maker

स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापण्यास सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Webdunia
गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (09:29 IST)
मुंबई  - राज्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी फिनलंडमधील विद्यापीठांना सहकार्य करण्यासंदर्भात सकारात्मकपणे पावले उचलण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे फिनलंड येथील ‘एलयूटी’ आणि लॅब विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
 
यावेळी अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ‘एलयूटी’ विद्यापीठाच्या अध्यक्ष टेरेसा केम्पी वस्मा, लॅब विद्यापीठाचे अध्यक्ष टुरो किल्पाईनेन, टुलटेकचे अध्यक्ष अतुल खन्ना, संचालक डॉ. रवींद्र मनियार, ‘केपीएमजी’चे आशीष माहेश्वरी हे उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देश आज वेगाने प्रगती करतो आहे. जगात सर्वात मोठी युवाशक्ती भारतात आहे. शिक्षण पद्धती वैश्विक बनत आहे. शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण क्षेत्रात देशात आणि राज्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्यावर भर देण्यात येत आहे. स्वायत्त विद्यापीठे यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरु शकेल. या पार्श्वभूमीवर फिनलंडमधील विद्यापीठांना महाराष्ट्रात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मामाच्या घरी जात असलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात बलात्कार, आरोपीला अटक

ओला, उबर, रॅपिडो ॲप्स कधीही बंद होणार, सरकारने नोटीस जारी केली

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार, माजी आमदार आसिफ शेख यांचा भाजपला सवाल

अमरावतीत उष्णतेची लाट, तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले

पुढील लेख
Show comments