Dharma Sangrah

मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा; पाणी पातळी खालावली

Webdunia
मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:10 IST)
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने परिसरातील, विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक सांगू लागले आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील खैरदरा परिसरातील नदीपात्रामध्ये भराव टाकून रस्ता तयार केल्या प्रकरणी महसूल विभागाने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र दोन दिवस होत नाही, तोच त्याच परिसरातील लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून पुन्हा वाळू उपसा सुरू झाला आहे. महसूल विभागाने दोन दिवसांपूर्वी खैरदरा परिसरात केलेली कारवाई फार्स असल्याची टीका स्थानिकांनी केली.पठारभागातून जाणार्‍या मुळापात्रातील नांदूर खंदरमाळ परिसरातील नदीकाठच्या भागातून मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा होतो.
 
नुकतेच मुळा पात्रात वाळू मुरूम टाकून नैसर्गिक नदीपात्रामध्ये भराव तयार करून मुळा पात्राचे विद्रुपीकरण केल्या प्रकरणी महसूल विभागाने दोन जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीही परिसरातील अन्य वाळू तस्करांवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. रविवार (20 फेबु्रवारी) दुपारी लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून जे.सी.बी मशिनच्या सहाय्याने पुन्हा वाळूउपसा सुरू होता.
 
याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी विरोध करताच वाळू तस्करांवर जे.सी.बी मशिन घेऊन नदीपात्रातून पळ काढला. महसूल अधिकारी अधूनमधून कारवाई करत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात हाती काही लागत नाही आणि वाळू चोरीही थांबत नाही,अशी परिस्थिती आहे. पथक येणार असल्याची माहिती चोरांना आधीच मिळते, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधी मिळत असल्याचेही गावकरी सांगतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा दिला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी APAAR ID नोंदणी करणे बंधनकारक केले

काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुशील सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा दिला, भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले

मनपा निवडणुका लवकरच, 15 डिसेंबर आचारसंहिता लागू होण्याचे संकेत

पुढील लेख
Show comments