Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याच्या काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट, काळजी घेण्याचे आव्हान

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (12:58 IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात कमालीची वाढ होत असताना दिसत आहे. अशातच मराठवाडा, विदर्भात सध्या तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अनेक भागात तापमान 40च्या पार गेले असताना पुढचे काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 
पुढचे दोन दिवस मराठवाड्यात तर विदर्भात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुढचे दोन ते दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
 
येत्या 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
 
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र शुक्रवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला गेला आहे. 
 
दरम्यान मागील काही दिवस पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि त्या आसपास होते. परंतु बुधवारी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर 6 एप्रिल रोजी अकोला येथे सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्रासह राजस्थान, दक्षिण हरियाणा-दिल्ली, पंजाब, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यात देखील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

ISROच्या 100 व्या मिशनला मोठा झटका

शारीरिक संबंध ठेवताना महिलेने शेजारच्या तरुणाचा गळा चिरला

पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड़वर 3 वर्षांसाठी बंदी

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, 4 जवानांसह 5 जणांचा मृत्यू

'वडिलांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करा', अंत्यसंस्कारावरून दोन भावांमध्ये वाद

पुढील लेख
Show comments