rashifal-2026

सेवा, निवडणूक व इतरसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन

Webdunia
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:31 IST)
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाइन वेबिनारचे दि. 25 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, सेवा, निवडणूक व इतर कारणाकरीता जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात अर्जदारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज दि.01 ऑगस्ट, 2020 पासून स्वीकारण्यात येत आहेत, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.
 
बरेच अर्जदार अद्याप वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. अर्जदारांना अर्ज भरताना पुढीलप्रमाणे अडचणी येतात उदा. कोणत्या प्रकारे अर्ज भरावा व कोणते दस्तऐवज जोडावे, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे स्तरावर गुरुवार दि.25फेब्रुवारी, 2021 रोजी ऑनलाईन वेबिनारचे  आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व अर्जदार, पालक व विद्यार्थी यांनी या ऑनलाईन वेबिनारचा  लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments