Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालकांनो चिमुरड्याकडे लक्ष द्या

Webdunia
मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (09:28 IST)
तामिळनाडूमधील मन्नाडी येथील स्ट्रिंजर्स स्ट्रिवर येथे गरम सांबार भरलेल्या भांड्यात पडून 18 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी आपली आई सुर्यासोबत राहत होती. एक वर्षापूर्वी सुर्या आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. पोट भरण्यासाठी सुर्या लोकांना डबे पोहोचवण्याचं काम करत होती.
 
सुर्या घराबाहेर गेली असता तिला मुलगी ओरडत असल्याचं ऐकलं. धावत येऊन पाहिलं असता मुलीच्या अंगावर गरम सांबार सांडलं असल्याचं तिने पाहिलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.चिमुरडीला किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 
 
राज ठाकरे यांचे सडेतोड उत्तर, आणि प्रेक्षकांच्या हशा
 
एका कार्यक्रमात प्रेक्षकांमधील एकाने त्यांना अमित ठाकरे यांनी राजकारणात सक्रीय होण्यासाठी कोणाकडून धडे घ्यावेत, असा प्रश्न विचारला.त्यावेळी  राज यांनी मी काय घरात गोट्या खेळतो काय, असा अभिनय करत उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले होते. त्यावेळी प्रेक्षकांमधून एकाने त्यांना अमित ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला.
 
अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय होत आहेत. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारण, समाजकारणाचे धडे घेतले आहेत. अमित यांनी कोणाकडून राजकारणाचे व समाजकारणाचे धडे घ्यावेत, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न राज यांना करण्यात आला. त्यावेळी राज यांनी क्षणाचाही वेळ न दवडता मी घरात काय गोट्या खेळतो का, असा प्रतिप्रश्न केला. त्यांच्या या उत्तराने संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments