Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादमध्ये एकाच दिवशी सहा जणांची आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 3 मार्च 2022 (13:19 IST)
औरंगाबाद - मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या 28 वर्षीय तरुणासह आणखी पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवसी वेगवेगळ्या घटनेत सहा आत्महत्या उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार हा आत्महत्येचा वार ठरला असून या दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात सहा जणांनी आत्महत्या केली आहे.
 
खान शहाजील रजा खान (वय 28 रा. शहा नगर बीड बायपास) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. दुसर्‍या घटनेत रिक्षाचालक 36 वर्षीय तरुणाने घरातील सीलिंग फॅनला ओढानिच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसर्‍या घटनेत आचारी काम करणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीने घरातील फॅनला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर चौथ्या घटनेत मजुरी काम करणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
गणेश वाल्मीक गोते (वय 22) रा. रोहिणी ता. चाळीसगाव जि. जळगाव ह. मू. सिद्धेश्वर नगर असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सहाव्या घटनेत अविनाश राजू पवार वय 22 रा. जोगेश्वरी ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. 
 
सर्व प्रकरणात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

संबंधित माहिती

Tennis: राफेल नदाल फ्रेंच ओपनमध्ये खेळणार!

निवडणूक आयोग ज्या फॉर्म 17 सी ची आकडेवारी जाहीर करत नाहीये, तो आहे काय?

Hit And Run Case : अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा आरोपींना 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

रिकी पाँटिंगने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची ऑफर नाकारली

व्हायरल मेम कुत्रा काबोसूचे निधन

COVID-19: कोरोना 'FLiRT' च्या नवीन प्रकाराची भारतात एंट्री

Pune Porsche Car Accident Case : चालक नाही तर कार अल्पवयीन मुलगा चालवत होता सीपी अमितेश कुमार यांची माहिती

Pune Hit and Run Case : अपघाताच्या वेळी मी गाडी चालवत होतो आरोपीच्या ड्रायव्हरने सांगितले

पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

IPL 2024: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचचे नाते संपुष्टात आले

पुढील लेख
Show comments