Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारचा गोंधळ सुरूच; या पोलिस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्तीचे नवे आदेश

Webdunia
बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (08:04 IST)
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत ईडी सरकारचा भोंगळ कारभार काही केल्या थांबण्याचे नाव दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच अपर पोलिस अधीक्षकपदी बढती देऊन नियुक्ती केलेल्या दोन अधिकाऱ्यांचे आता नव्याने नियुक्ती आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.
 
आयपीएस असलेले निलेश तांबे यांना अपर पोलिस अधीक्षकपदी बढती देऊन त्यांची मालेगाव येथे पदस्थापना करण्यात आली होती. तर पंकज शिरसाठ यांनाही बढती देत त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  सरकारचा बदल्यांमधला गोंधळ सुरूच आहे. गृह विभागाने आज पुन्हा नवा आदेश जारी केला आहे.
 
नव्या आदेशानुसार, निलेश तांबे यांची अपर पोलिस अधीक्षक नंदुरबार, तर पंकज शिरसाठ यांची अपर पोलीस अधीक्षक पालघर अशी नियुक्ती केली आहे. याशिवाय अनिकेत भारती यांची अपर पोलिस अधीक्षक मालेगाव येथे नियुक्ती करण्यात आली असून विजय पवार यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहेत. बदलीचे आदेश जारी करून मग काही बदल्यांना स्थगिती, पुन्हा नवा बदली आदेश असा खेळच सध्या दिसून येत आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

नागपुरात जोडप्याला अनियंत्रित कंटेनरने चिरडले, दुचाकीचालक पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

LIVE: राष्ट्रवादीचे दोन दिवसीय 'नवसंकल्प शिबिर' आता शिर्डीत होणार

राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या पावलावर पाऊल, राष्ट्रवादीचे दोन दिवसीय 'नवसंकल्प शिबिर' आता शिर्डीत होणार

सैफ अली खान प्रकरणातील 30 तासांनंतर सापडला सुगावा, मुंबई पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली

इम्रान खान आणि बुशरा बीबी भ्रष्टाचार प्रकरणात दोषी,माजी पंतप्रधानांना 14 वर्षांची शिक्षा

पुढील लेख
Show comments