Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानीने फुंकले लोकसभेचे रणशिंग; हातकणंगलेसह 5 ते 6 जागा स्वबळावर लढवणार

Webdunia
गुरूवार, 23 मार्च 2023 (08:56 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी  गुढीपाडव्याचा मुहुर्त साधून लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात लोकसभेच्या हातकणंगलेसह 5 ते 6 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. ते आज आपल्या पक्षाच्या अभ्यास शिबिराच्य़ा सांगता समारंभात बोलत होते.
 
आपल्या कार्यकारणीला संबोधित करताना ते म्हणाले, “यापुर्वी आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो होतो. त्यानंतर भाजपमधून बाजूला झालो. स्वाभिमानीचा शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, आणि समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने संघर्ष सुरु असून रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार लोकशाहीच्या विरोधात असून लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही” असा समज त्यांनी सरकारला दिला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे महत्वाचे आहे. मी मांडलेला हमीभावाचा कायदा अजूनही प्रलंबित आहे.  
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा

अधिवेशन सोडल्यानंतर संतप्त छगन भुजबळ बाहेर आले, म्हणाले- मान मिळाला नाही

ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा,गोदाम मालकावर गुन्हा दाखल

भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जगात नंबर 1असेल, नितीन गडकरी यांचे भाकीत

युद्धबंदीच्या घोषणेपासून इस्रायली हल्ल्यात 72 ठार

पुढील लेख
Show comments