Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्देवी ! घराला लागलेल्या आगीत आई, पत्नीसह 2 मुलांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 29 मार्च 2021 (16:28 IST)
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एका दुर्देवी घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मोखाड्याजवळील ब्राह्मण गाव येथील एका घर आणि दुकानाला लागलेल्या आगीमध्ये मौळे कुटुंबातील चार जणांची होरपळून मृत्यू झाला. ब्राह्मण गावमधील अनंता मौळे यांच्या मालकीच्या घराला आणि दुकानाला २९ मार्च रोजी रात्री अडीचच्या सुमार आग लागली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या मोठ्या ज्वाला आणि धूर दिसू लागल्यानंतर गावकरी मदतीला धावले.
 
रात्री आग लागल्यामुळे घरातील सर्वच सदस्य झोपेत होते. ही आग लागल्यानंतर घरातील काही सदस्यांना बाहेर पडण्यात यश आलं तर काही जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला. मरण पावलेल्यांमध्ये अनंता मौळे यांची आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, १५ वर्षांची मुलगी पल्लवी मौळे आणि दहा वर्षांचा मुलगा कृष्णा मौळे यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या दुर्देवी घटनेमध्ये अनंता मौळे आणि त्यांची दोन मुलं वाचली आहेत. १२ वर्षीय भावेश आणि १७ वर्षीय अश्विनी यांच्यावर नाशिकमधील दवाखान्यामध्ये उपचार सुरु आहेत. या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

संबंधित माहिती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments