Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर मी फक्त तोंड दाखवण्यासाठी आलो नाही” तर…. , पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2023 (20:56 IST)
At Thakurwadi on Ershalgarh ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून किमान ४० ते ५० घरं मलब्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही घटनास्थळी पाऊस चालू असल्यामुळे एनडीआरएफच्या बचाव पथकांना मदतकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
 
दरम्यान आज शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत धीर दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “बोलण्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत. ही दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर मी फक्त तोंड दाखवण्यासाठी आलो नाही. तर, भविष्यात तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत.”
 
“आसपासच्या वस्त्या आणि तुमचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करू की पुन्हा अशा संकटाशी सामना करण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच वस्त्या दरडग्रस्त कधीही होऊ शकतात. पण, म्हणून आपण जबाबदारी टाळू शकत नाही. ही घटना घडण्यापूर्वी येथील पुनर्वसन झालं पाहिजे होते. पण, दुर्दैवाने ही घटना घडली आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
 
“अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तरुण आणि महिलांना नोकरीची व्यवस्था करावी. फक्त घर बांधून पुनर्वसन होणार नाही. यात राजकारण कुठेही आणणार नाही. राजकारणाच्या पलीकडे माणुसकी हा भाग असतो. पुनर्वसन होईपर्यंत ज्या गोष्टींची मदत लागेल, ती करू,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments