Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता जिओटीव्ही वर

Webdunia
मंगळवार, 5 जुलै 2022 (17:18 IST)
महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता भाविकांना जिओ टीव्ही च्या माध्यमातून घरबसल्या घेता येणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांसाठी जिओ तर्फे ही एक अनोखी भेट असणार आहे.
 
आषाढी तसेच कार्तिकी एकादशी ला पंढरपूर येथे भाविकांचा महासागर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतो. लाखो भाविक तासन तास रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शन घेतात. परंतु सर्वाना कोरोना महामारीमुळे आणि अन्य कारणाने पंढरपूर येथे जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही. वयोवृद्ध तसेच आजारी भाविकांना इच्छा असूनही दर्शन घेता येत नाही परंतु आता जिओ टीव्ही च्या माध्यमातून ही अडचण दूर होणार आहे. आता घरबसल्या कधीही 24 तास पांडुरंगाचे दर्शन घेता येणार असून महापूजा, अभिषेक तसेच इतर विधी घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहेत. जिओ टीव्ही अँप डाउनलोड करून तसेच क्यू आर कोड स्कॅन करून देखील लाईव्ह दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
 
जिओ टीव्ही वर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविक 'दर्शन' आयकॉन वर क्लिक करून विठ्ठल रुक्मिणी चॅनेल वर जाऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेऊ शकतात.याआधी जिओ टीव्ही वर श्री अमरनाथ, चार धाम, तुळजापूर, कोल्हापूर ची महालक्ष्मी, अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा यासारख्या देवतांचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून भाविक दररोज या देवतांचे लाईव्ह दर्शन घेतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Chath Aarti छठ मातेची आरती

नृसिंहस्तोत्रम्

आरती गुरुवारची

दशावतारस्तोत्रम्

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments