Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जावेद हबीब यांचा भाजपमध्ये प्रवेश, नरेंद्र मोदी - अमित शहा यांचे असे झाले केस - सोशल

Webdunia
बुधवार, 24 एप्रिल 2019 (10:06 IST)
सेलेब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब भारतीय जनता पक्षात सामील झाले. "आतापर्यंत मी केसांची चौकीदारी करायचो. आता मीसुद्धा देशाचा चौकीदार आहे," असं ते सोमवारी म्हणाले.
 
"मी भाजपात सामील झालो, याचा मला आनंद आहे. नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षांत देश कसा बदलला, हे मी पाहिलं आहे. आपल्या पार्श्वभूमीची कुणालाही लाज वाटता कामा नये, असं मला वाटतं. जेव्हा मोदी स्वत:ला चहावाला म्हणवतात तर मी स्वत:ला हेअरस्टायलिस्ट म्हणवून घेण्यात काय गैर आहे?"
 
जावेद हबीब यांच्या नावाने देशभरात अनेक लक्झरी सलून आहेत. ते लोकांसाठीच्या आगळयावेगळ्या केशभूषेसाठी ओळखले जातात. त्यामुळे ते भाजपात समील झाल्यावर त्यांच्या या कौशल्याचा वापर लोकांनी अनेक मीम्स तयार करण्यासाठी केला.
 
या मी्म्सचं सगळ्यात मोठं लक्ष्य ठरले भाजपचे नेते. सोशल मीडियावर अनेकांनी फोटोशॉपद्वारे भाजप नेत्यांना नवनवीन हेअरस्टाईल करून दिल्या. या मीम्सने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
 
बघूया काही मजेदार फोटो
बिलाल अहमद लिहितात जावेद हबीब भाजपात आल्यावर योगी आदित्यनाथ असे दिसतील.
 
महेश बाबू लिहितात की जावेद हबीब भाजपात आल्यावर त्यांची परिस्थिती काहीशी अशी झाली.
काही लोकांनी जावेद हबीबच्या भाजपात जाण्याचा विरोध केला पाहिजे, असंही काही लोकांचं म्हणणं होतं.
यातून बघा कशी विनोदनिर्मिती झाली ते बघूया.
ट्विटर हँडल @BelanWali ने लिहिलं, जावेद हबीब भाजपात गेल्यानंतर लोकांनी त्याच्या सलूनवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली आणि इथे जायला सुरुवात केली.
 
जावेद हबीब भाजपात सामील झाले तरी त्याचा परिणाम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पहायला मिळाला.
अरविंद केजरीवाल यांनाही त्याचा फटका बसला.
 
दीपक यांनी "जावेद हबीब यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे झाडाखाली बसून केस कापून घेणारे लोकही जावेद हबीबवर बहिष्कार टाकतील," अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.
 
काही लोकांनी त्यांचा भूतकाळही उकरून काढला.
 
@licensedtodream लिहितात, "हा जावेद हबीब तोच आहे, ज्यांनी सलूनच्या जाहिरातीत देवी देवतांचा फोटो वापरल्याबद्दल माफी मागितली होती."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments