Festival Posters

पर्यटन, खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले प्रगत शहर इंदूर मध्य प्रदेश

Webdunia
शुक्रवार, 30 मे 2025 (07:30 IST)
India Tourism : भारतात अनेक पर्यटन स्थळे आहे. अनेक शहर त्यांच्या त्यांच्या काही विशेष गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक शहराचे आपले काही खास वैशिष्ट्य आहे. आज आपण भारतातील असेच एक खास, स्वछ, सुंदर प्रगत शहर पाहून आहोत. ज्याचा भारतात स्वच्छतेसाठी प्रथम क्रमांक लागतो. ते स्वच्छ, मोठे शहर म्हणजे मध्य प्रदेश मधील इंदूर शहर होय. कोणी इंदूर म्हणतात तर कोणी इंदोर म्हणतात. इंदूर शहरात सर्व धर्माचे लोक मोठ्या आपुलकीने राहतात. तसेच इंदूर मध्ये हिंदी, मराठी आणि माळवी; इंग्रजीही बोलली जाते.
मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाणारे इंदूर हे शहर अनेक सुंदर पर्यटन, खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच इंदूर हे मध्य प्रदेशातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रगत शहर, पर्यटनासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. हे शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आधुनिक पर्यटन स्थळांचे मिश्रण आहे.  
 
इंदूर शहराचा परिचय
इंदूर हे शहर मध्य प्रदेशच्या माळवा पठारावर, खान आणि सरस्वती नद्यांच्या काठावर वसलेले आहे. तसेच इंदूर हे शहर स्वच्छता, खाद्यसंस्कृती (फूड कॅपिटल ऑफ इंडिया), ऐतिहासिक स्थळे आणि शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. इंदूर मधील उष्ण आणि कोरडे हवामान तसेच पावसाळ्यात सौम्य, हिवाळ्यात थंड असे असते हा कालावधी पर्यटनासाठी उत्तम आहे.
 
इंदूर मधील प्रमुख पर्यटन स्थळे
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे
राजवाडा पॅलेस - 18व्या शतकातील होळकर राजवंशाने बांधलेला हा राजवाडा मराठा, मुगल आणि फ्रेंच स्थापत्यशैलीचा नमुना आहे. तसेच हा राजवाडा शहराच्या मुख्य ठिकाणी असून सात मजली इमारत, सुंदर प्रवेशद्वार आणि लाकडी खांब यामुळे ही वास्तू जगभर प्रसिद्ध आहे. तसेच राजवाडा येथे रात्रीच्या लाइटिंग शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 
भेट देण्याची वेळ: सकाळी 7 ते रात्री 8, प्रवेश शुल्क: सुमारे ₹10-20.
 
लाल बाग पॅलेस- होळकर राजवंशाचा आणखी एक भव्य वाडा, युरोपियन स्थापत्यशैलीने प्रेरित लाल बाग पॅलेस हा इंदूर मधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. तसेच या पॅलेस मध्ये चित्रपटांचे शूटिंग देखील होतात. तसेच या पॅलेस मध्ये संग्रहालयात होळकरांचे शस्त्रास्त्रे, चित्रे आणि पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहे. या पॅलेसच्या परिसरात सुंदर बाग देखील आहे. 
भेट देण्याची वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 5, प्रवेश शुल्क: ₹10-50.
 
कांच मंदिर- हे एक जैन मंदिर असून, पूर्णपणे काचेच्या सजावटीने बनवलेले आहे. तसेच रंगीत काचेच्या आरशांनी सुशोभित असून येथे जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहे. 
भेट देण्याची वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 5, प्रवेश मोफत 
 
अन्नपूर्णा मंदिर-अन्नपूर्णा मंदिर हे दक्षिण भारतीय मंदिर शैलीने प्रेरित असून अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे. अतिशय सुंदर असे नक्षिकाम आणि दक्षण भारतीय शैलीत हे मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिर परिसरात विष्णू, शिव आणि हनुमान मंदिरेही आहे. येथे नेहमी शांत आणि धार्मिक वातावरण असते. 
 
नैसर्गिक आणि मनोरंजन स्थळे
पातालपाणी धबधबा- इंदूर शहरापासून पासून 35 किमी अंतरावर, माळव्यातील हा 
प्रसिद्ध धबधबा आहे. तसेच हे ठिकाण पावसाळ्यात विशेष आकर्षक, पिकनिक आणि ट्रेकिंगसाठी योग्य मानले जाते 
 
रालमंडल वन्यजीव अभयारण्य-इंदूरपासून 12 किमी, पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते. या अभयारण्यात हरण, सांबर, नीलगाय यांसारखी वन्यजीव पाहावयास मिळतात आणि  ट्रेकिंगसाठी उत्तम आहे 
भेट देण्याची वेळ: सकाळी 8 ते सायंकाळी 6, प्रवेश शुल्क: ₹50-100.
 
मेघदूत गार्डन-मेघदूत गार्डन हे शहरातील सुंदर उद्यान असून कुटुंबांसाठी पिकनिक स्पॉट करीत प्रसिद्ध आहे येथे संगीतमय कारंजे, मुलांसाठी खेळणी आणि बोटिंग सुविधा उपलब्ध आहे 
 
सेंट्रल म्युझियम-परमार आणि होळकर राजवंशाच्या पुरातन वस्तू आणि शिल्पे येथे पाहावयास मिळतात 
तसेच मध्य प्रदेशच्या इतिहासाची झलक येथे दृष्टीस पडते 
भेट देण्याची वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 5, प्रवेश शुल्क: ₹10-50.

इंदूरच्या जवळपासच्या पर्यटन स्थळे
उज्जैन (55 किमी): महाकालेश्वर मंदिर आणि कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध.
महेश्वर (90 किमी): नर्मदा नदीकाठ, अहिल्याबाई होळकरांचा किल्ला.
मांडव (100 किमी): रोमँटिक आणि ऐतिहासिक स्थळ, जहाज महल आणि रानी रूपमती पॅव्हेलियन.
 
आधुनिक आणि खरेदी स्थळे
सार्वजनिक बाजार आणि खरेदी-पारंपरिक माहेश्वरी आणि चंदेरी साड्या, ड्रेस, दागिने आणि हस्तकला हे इंदूरच्या बाजाराचे खास वैशिष्ट्ये आहे तसेच शहरातील एमटी क्लॉथ मार्केट हे कापड आणि साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. 
 
खाद्यसंस्कृती-इंदूरला "फूड कॅपिटल ऑफ इंडिया" म्हणतात, आणि येथील खाद्यपदार्थ पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच इंदूर मध्ये पोहा-जलेबी हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वात लोकप्रिय आहे. तसेच दाल-बाफला, भुट्टे किस हे देखील येथील प्रसिद्ध पदार्थ आहे. तर गुलाब जामुन, रबडी आणि मालपुआ हे इंदूर मधील स्वीट डिश म्हणून प्रसिद्ध आहे तसेच इंदूरचे नमकीन जे जगभर प्रसिद्ध आहे. 
 
प्रसिद्ध ठिकाणे-
छप्पन दुकान: 56 दुकानांचा फूड स्ट्रीट, विविध खाद्यपदार्थांसाठी आहे. 
सराफा बाजार: रात्रीच्या वेळी स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. 
 
सण आणि उत्सव
रंगपंचमी: होळी नंतर पाचव्या दिवशी साजरा केला जाणार उत्सव ज्यात रंग उधळून गेर काढली जाते.
गणेश चतुर्थी: मोठ्या उत्साहात साजरी केली जाते भव्य मिरवणुका निघतात. 
तानसेन संगीत समारोह: डिसेंबरमध्ये, शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी हा समारोह आयोजित करण्यात येतो. 
 
इंदूरचे वैशिष्ट्य
स्वच्छतेच्या बाबतीत भारतातील अव्वल शहर.
माळवी संस्कृती, आतिथ्य आणि खाद्यपदार्थांचा अनोखा संगम.
शैक्षणिक केंद्र: IIT आणि IIM इंदूर येथे.
इंदूर हे इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि खाद्यपदार्थांचे परिपूर्ण मिश्रण आहे. पर्यटकांसाठी हे शहर प्रत्येक दृष्टिकोनातून अविस्मरणीय अनुभव देते.
 
इंदूर कसे जावे? 
हवाई मार्ग-देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ, देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले असून येथून तुम्ही कॅपच्या मदतीने शहरात येऊ शकतात. 
रेल्वे मार्ग-इंदूर जंक्शन, मुंबई, दिल्ली, कोलकाता यांना जोडलेले आहे. 
रस्ता मार्ग- NH-47 आणि NH-59 ने जोडलेले असून बस आणि टॅक्सी उपलब्ध आहे. 
 
इंदूर पर्यटन टिप्स
सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च, हवामान सौम्य असते.
स्थानिक वाहतूक: ऑटो रिक्षा, ओला-उबर, सिटी बस उपलब्ध आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

Places to visit on Republic Day प्रजासत्ताक दिन विशेष भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करतील

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments