Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयुष्मान खुराना ला एंजल इन्व्हेस्टमेंट मध्ये 400% परतावा!

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (12:49 IST)
इमामीने 'द मॅन कंपनी' चे 400 कोटी रुपयांच्या मुल्यांकनावर अधिग्रहण केले.बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना, जो एक कुशल गुंतवणूकदार देखील आहे, त्यांनी 'द मॅन कंपनी' मध्ये त्यांच्या एंजल गुंतवणुकीवर 400% परतावा मिळवला आहे. पुरुषांच्या ग्रूमिंगसाठी प्रसिद्ध असलेली ही प्रीमियम ब्रँड 'द मॅन कंपनी', जी आता घराघरात ओळखली जाते, इमामी लिमिटेडकडून 400 कोटी रुपयांच्या मुल्यांकनावर खरेदी केली जाणार आहे!
 
आयुष्मान खुरानाने 2018 मध्ये 'द मॅन कंपनी' मध्ये गुंतवणूक करत व्यवसायात प्रवेश केला. पुरुषांसाठी उच्च गुणवत्ता असलेल्या ग्रूमिंग उत्पादनांची वाढती मागणी ओळखून, त्यांनी कंपनीच्या व्हिजनमध्ये मोठी क्षमता पाहिली, ज्याने भारतातील पुरुष ग्रूमिंग क्षेत्रात क्रांती घडवण्याचा उद्देश ठेवला होता.आयुष्मान चे द मैन कंपनी सोबतचे योगदान फक्त आर्थिक गुंतवणुकीपुरते मर्यादित नव्हते - ते ब्रँडच्या कॅम्पेनिंग, उत्पादन नवकल्पना आणि पुरुषांच्या जीवनशैलीबद्दलच्या त्यांच्या समजामुळे ब्रँडच्या वाढीस मदत झाली.
यशराज फिल्म्स आणि त्यांची प्रतिभा व्यवस्थापन शाखा YRF टॅलेंटने आयुष्मान आणि 'द मॅन कंपनी' यांच्यातील भागीदारी यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
 
आयुष्मानने केवळ गुंतवणूकदार म्हणून नाही तर ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही 'द मॅन कंपनी' च्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या दृष्टिकोनामुळे आणि उद्योगातील ज्ञानामुळे ब्रँडच्या विकासाला अधिक चालना मिळाली. आयुष्मानच्या प्रामाणिकपणा आणि करिष्म्याचे प्रतिबिंब 'द मॅन कंपनी' च्या #GentlemanKiseKehteHain सारख्या व्हायरल मोहिमेत देखील दिसून आले, ज्याने ब्रँडचे लक्ष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत केली.
 
आयुष्मान म्हण, "तो मी 'द मॅन कंपनी' च्या व्हिजन आणि मिशनवर नेहमीच विश्वास ठेवला आहे. या ब्रँडच्या यशाचा भाग होणे आणि याने पुरुषांच्या ग्रूमिंग इंडस्ट्रीवर केलेल्या प्रभावाला पाहणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गुंतवणूकदार आणि ब्रँड अॅम्बेसेडर या दोन्ही रूपांमध्ये या प्रवासाचा भाग होणे खूप समाधानकारक अनुभव होता."
 
'द मॅन कंपनी' चे संस्थापक हितेश धिंगरा म्हणाले, "आयुष्मानसोबत भागीदारी आमच्यासाठी गेम-चेंजर ठरली आहे. त्यांच्या विश्वासाने आणि सक्रिय सहभागाने आमच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मी मनन मेहता यांचे आभार मानतो, ज्यांनी या यशस्वी सहयोगाला आकार देण्यासाठी नवोन्मेषपूर्ण दृष्टिकोन आणि व्यावसायिक गरजांची अचूक समज दाखवली आहे."
 
इमामी लिमिटेड, जी विश्वसनीय वैयक्तिक देखभाल उत्पादने बनविण्यात प्रसिद्ध आहे, तिने 'द मॅन कंपनी' ची क्षमता ओळखली आणि ती त्यांच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय घेतला. हे अधिग्रहण दोन्ही कंपन्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण इमामी 'द मॅन कंपनी' च्या नवीन उत्पादनांचा फायदा घेत पुरुषांच्या ग्रूमिंग क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत करणार आहे.
(आपण हा कॅम्पेन येथे पाहू शकता - https://youtu.be/cpA0J62LMB0?si=RcnzU9nkqjJa9zaa)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच

होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार

Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

सर्व पहा

नवीन

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

महालक्ष्मी मंदिर डहाणू

स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला

कोकण भ्रमंती : रमणीय स्थळ कुर्ली

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

पुढील लेख
Show comments