Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Exam Tips : परीक्षेत यश मिळेल, या 7 टिप्स अवलंबवा

Webdunia
सोमवार, 2 मे 2022 (22:41 IST)
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा असो किंवा बोर्डाची परीक्षा असो. योग्य दिशेने तयारी केली, तर प्रत्येकजण या परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतो. मात्र परीक्षेचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसे विद्यार्थी चिंताग्रस्त होऊ लागतात. अशा स्थितीत परीक्षेतून लक्ष निघून जातं आणि मनात जडपणा आणि भीती वाटते. परंतु विद्यार्थ्यांनी काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिल्यास परीक्षेच्या चिंतेपासून बऱ्याच प्रमाणात सुटका होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया परीक्षेत यश मिळवण्याचा पक्का मंत्र कोणता आहे.
 
1 परीक्षा द्यायची आहे- मनात कितीही भीती असली तरी ही परीक्षा ही द्यावयाची आहे.आपण हे सत्य स्वीकारावे. जेणे करून आपल्या मनातील परीक्षेची भीती कमी होईल. परीक्षा नसेल तर मुलं अभ्यासाचं करणार नाही. त्यांना अभ्यासाचे आणि परीक्षेचे महत्व कधीच समजणार नाही. आणि ते स्पर्धेत चांगले परिणाम मिळवू शकणार नाही.त्यांचे सर्वोत्तम परिणाम देऊ शकणार नाही. त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी परीक्षेचा ताण अनिवार्य आहे हे समजून घ्या.
 
2 कॉन्सेप्ट क्लियर असावे- असं  म्हणतात की ''वाचाल तर वाचाल '' काही मुलं अभ्याक्रम न समजून घेता पाठांतर करतात. असं केल्याने पाठ केलेले लवकर विसरतात. आणि परीक्षेत आपण पाठांतर केलेला  प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारल्यास आपण गोंधळू शकता. म्हणून कधी ही पाठांतर करताना समजून पाठ करा. कॉन्सेप्ट समजून घ्या. विषया बद्दल आणि शिकणाऱ्या धड्याचे कॉन्सेप्ट क्लिअर असल्यास कोणत्याही परीक्षेत आपण सहज प्रश्न सोडवू शकाल.या साठी शाळेत होणाऱ्या चाचणी टेस्ट मध्ये अर्धवार्षिक परीक्षेत सहभागी व्हावं. जेणे करून आपल्या मनातून परीक्षेची भीती दूर पळेल.
 
3 लेखनाचा सराव आवश्यक आहे -केवळ वाचन आणि पाठ करून आणि आपल्या मनातल्या मनात त्याची पुनरावृत्ती करून लक्षात ठेवण्याच्या पद्धतीवर कधीही अवलंबून राहू नका. सर्वप्रथम अध्याय वाचा. मग प्रश्नोत्तरे लक्षात ठेवा. यानंतर, ते लिहून बघा  आणि तुम्ही किती टक्के बरोबर लिहिता ते पहा, चुका कुठे होत आहेत आणि तुम्ही प्रश्नाचे उत्तर किती वेळात लिहिता ते पहा. परीक्षा हॉलमधील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे, त्यामुळे आपली तयारी अर्धवट राहू नये. दिवसातून किमान अडीच तास लिहिण्याचा सराव करा. अनेक वेळा लेखनाचा सराव नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तीन तासांत सर्व उत्तरे लिहिता येत नाहीत. आणि परीक्षेत वेळेअभावी प्रश्न सुटतात.
 
4 रुटीन बनवा - बरेच विद्यार्थी खूप उत्साहानेअभ्यासासाठी रुटीन बनवतात.आणि अतिशय घट्ट आणि परिपूर्ण दिनचर्या बनवतात, जी दिसायला अतिशय योग्य असतात परंतु व्यावहारिकदृष्ट्या हे पाळणे कठीण होते. सकाळी 5 वाजता उठणे आणि रात्री 11 वाजता झोपणे. या दरम्यान त्यांना ना खेळण्यासाठी वेळ मिळतो ना मनोरंजनासाठी, ना खाण्यापिण्यासाठी योग्य वेळ. परिणामी पहिल्याच दिवशी हा दिनक्रम कोलमडतो. नेहमी योग्य वाचन दिनचर्या बनवा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा. या दिनचर्येत विश्रांती आणि खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे.
 
5  ऊर्जा वेळ जाणून घ्या- जर आपल्याला वाचन बरोबर करायचे असेल, तर आपण  सर्वात उत्साही आणि निवांत मूडमध्ये असतानाची वेळ ओळखा आणि त्या वेळात वाचा. अनेक विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठून वाचण्याची सवय असते तर काहींना रात्री उशिरा कठीण गोष्टींचा अभ्यास करायला आवडते. आपण आपला वेळ ओळखा आणि त्या एनर्जी टाइम मध्ये कठीण  विषयांचा अभ्यास करा.असं केल्याने आपले काम खूप सोपे होईल.
 
6 सर्व विषयांना वेळ द्या -बरेच विद्यार्थी काही विषयांना खूप सोपं समजून त्या विषयाचा अभ्यास करत नाही . आणि असं करता -करता परिक्षेची वेळ जवळ येते.मग त्यांना वाटू लागतं की त्यांचा या विषयाचा अभ्यास अद्याप झालेलाच नाही.अशा परिस्थितीत त्यांना दडपण येत. आपण देखील अशी चूक कधीही करू नका. सुरुवातीपासूनच सर्व विषयांना योग्य वेळ द्या. वर्गाच्या अभ्यासादरम्यान तयार केलेल्या वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स वाचत राहा. नियमितपणे अभ्यासक्रमाची उजळणी करत रहा.
 
7 शिक्षक-विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करा- शक्य असल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा असा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करा ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही सहभागी असतील. आपल्याला काही अडचण असेल तर आपण या ग्रुपवर पोस्ट करू शकता. या ठिकाणी आपल्या समस्यांचं समाधान मिळेल. त्याचप्रमाणे काही नवीन माहिती असल्यास त्याची देवाणघेवाण करता येईल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments