Dharma Sangrah

मल्हारी मार्तंड विजय अध्याय विसावा

Webdunia
बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:37 IST)
॥ श्री मार्तंड भैरवाय नम: ॥ सनत्कुमार ऋषीस म्हणे ॥ षष्ठी तीर्थाचे माहात्म्य ऐकणे ॥ मी सांगतो तें श्रवण करणें ॥ आवडी धरुनी ॥१॥
करितां रामतीर्थी स्नान ॥ होय पातक नाशन ॥ मल्लेश्वर तीर्थदर्शन ॥ ब्रह्महत्या जातसे ॥२॥
सूर्यतीर्थी स्नान होय ॥ अष्टादश कुष्ट जाय ॥ योणीत तीर्थी स्नान होय ॥ पातक दूर होतसे ॥३॥
वैतरणीचें स्नान ॥ विष्णुलोकाप्रति जाण ॥ परशुराम तीर्थी नाहणें ॥ मुक्ति प्राप्त होतसे ॥४॥
शिवतीर्थी इच्छा संपूर्ण ॥ कोटि तीर्थे पातक निरसन ॥ अश्वतीर्थी स्वर्गासि जाण ॥ शक्तितीर्थी स्नानें शक्तिवंत ॥५॥
अग्नीकुंड स्नानें दशयज्ञ फल ॥ गणपति तीर्थे विद्याकुशल ॥ काळभैरवी उत्तम होईल ॥ प्रयागसंगमीं देवता तुष्टी ॥६॥
सर्व तीर्थासी सर्व पातक नाश ॥ एकादशरुद्रलोकीं वास ॥ वरुणतीर्थी पावे मुक्तिस ॥ पार्वतीतीर्थे कामना पूर्ण ॥७॥
भोगावतीतीर्थी स्नान ॥ ऋषि करिती अनुष्ठान ॥ तेणें तीर्थ जाहलें निर्माण ॥ त्यांचे नाम परिसां तुम्हीं ॥८॥
अगस्ति अत्री पौलस्तिक ॥ भृगु अंगिरा भारद्वाज वसिष्ठ कश्यप शौलक ॥ जमदग्नि भार्गव चवन ॥ अंबरींष गुरु कहोळक ॥ पराशर मातंग पुंडरीक कौशिक कण्व ॥९॥
वत्स वैरवानस बोधि मांडव्य कुंडन ॥ व्यास सांख्य कुत्स गालव सौभरी वात्सायन ॥ शांडिल्य मंडुक वाल्मींकी जाबाली रेभी अग्नि यम जाण ॥ कंदर्प ब्रह्म हरिहर कुबेर वायु ॥१०॥
ऐसे षष्ठतीर्थ जाण ॥ स्नान अथवा होता दर्शन ॥ चुकती जन्ममरण ॥ चौर्‍यांशी फेरे तुटती ॥११॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यातील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥२२॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां षष्ठतीर्थवर्णनो नाम विशंतितमोऽध्याय: ॥२०॥
ALSO READ: मल्हारी मार्तंड विजय अध्याय एकविसावा
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

अंगारक संकष्टी चतुर्थी उपवासाच्या वेळी या चुका टाळा; आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह

६ जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, व्रत- पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments