Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मल्हारी मार्तंड विजय अध्याय एकविसावा

Webdunia
बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:38 IST)
॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ बोले सनत्कुमार ॥ परिसा सकाळ ऋषीश्वर ॥ पूजा माहात्म्य विस्तार ॥ ह्याळसापति स्वयें बोले ॥१॥
भक्ति प्रीति कथा जाण ॥ कांक्षा माझि जप ध्यान ॥ पूजा स्तोत्र अनुसरण ॥ हे अष्टधा भक्ति माझी ॥२॥
मज सर्वगत पाहती ॥ मीच एक त्रिभुवनीं जाणती ॥ मजवांचुनी दुजाप्रति ॥ जाणतीच ना मम भक्त ॥३॥
त्यांचे ठायीं मी असे ॥ ते मजमाजींच वसे ॥ मजतयासी भेद नसे ॥ त्रिभुवनीं धन्य मम भक्त ॥४॥
जे लागले माझे पदां ॥ त्यांसि बाधा न बाधे कदा ॥ माझें ध्यान करितां सदा ॥ तथा आपदा कधीं न होय ॥५॥
करुनि सद्गुरुची पूजा ॥ न्यासपूर्वक मंत्र माझा ॥ घेवोनि जपे तो योगी राजा ॥ तयास मुखें म्हणेन मी ॥६॥
मनीं धरुनी प्रेम ॥ आयुध अश्वासहित उत्तम ॥ माझी करोनि प्रतिमा समे उमा ॥ पूजिती ते मज प्रिय ॥७॥
घालोनि पंचामृत स्नान ॥ गंधाक्षता वस्त्र भूषण ॥ धूपदीप नैवेद्य समर्पण ॥ तांबूल अर्पण मजलागीं ॥८॥
माझें माहात्म्यपुस्तक ॥ मनीं धरोनि भावनिक ॥ पूजा करितांचि देख ॥ प्राप्ती ब्रह्मपदवीची ॥९॥
पारिजातें जो पूजिजेल ॥ इंद्रलोकासी जाईल ॥ शुभ्रकमल पुष्प वाहील ॥ स्वर्गलोक प्राप्ति तया ॥१०॥
मालतीनें कैलासवास ॥ काळे तांबडे निळे सुवास ॥ सुवर्ण पुष्पें पूजिलियास ॥ इच्छिलेलें पूर्ण होय ॥११॥
चंपक पाटलाब्दी मल्लिका ॥ पूजितां जाय रुद्रलोका ॥ मंदार करवीर कदंब निका ॥ कांचन बकुलें रुद्रदूत होती ॥१२॥
शरत्कालीं पुष्प जें जें ॥ लक्षावधी वाहिजे ॥ नागवेलीं पूजा कीजे ॥ पाताळ लोकासी जाईल ॥१३॥
आघाडा दूर्वा वाहतां ॥ ऐश्वर्य होय प्राप्त ॥ तुळसी बिल्व पूजितां ॥ कोटी कल्प कैलासवास ॥१४॥
चैत्र शुध्द चतुर्दशसि ॥ पूजितां पावे परम गतीस ॥ अक्षता घालोनि हळदींत ॥ पूजितां शत्रु वश्य होय ॥१५॥
चैत्र शुक्ल तृतीयापासून ॥ मासापर्यंत केलें पूजन ॥ केवळ मदनरुप जाण ॥ दिव्य शरीर होतसें ॥१६॥
आषाढ श्रावणमास दर्शन ॥ होतांचि होय पवित्र तेणें ॥ खंडे महानवमी वाघ्या नाचणें ॥ पाहतांक्षणी स्वर्गप्राप्ती ॥१७॥
स्कंदषष्ठी यात्रेस ॥ निघे मार्तंड पाहावयास ॥ एक एक पाऊलास ॥ अश्वमेध यज्ञफल ॥१८॥
साठी ब्राह्मण अन्नदान ॥ देतां होय बहुत पुण्य ॥ रविवारीं द्रव्य अलंकार देणें ॥ कोटी यज्ञफल होय ॥१९॥
शनिवारी उपोषण ॥ पूजा करितां इच्छा पूर्ण ॥ रविवारीं एकभुक्त दर्शन ॥ मल्लारींस आनंद बहु ॥२०॥
उधळीलें भंडार घेऊन ॥ पूजा कीजे प्रेमें धरुन ॥ त्यासी शिवलोकचि प्राप्त जाण ॥ हें वचन सत्य माझें ॥२१॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥२२॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां पूजाफलनिरुपणो नाम एकविंशतिंतमोऽध्याय: ॥२१॥
ALSO READ: मल्हारी मार्तंड विजय अध्याय बाविसावा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मल्हारी मार्तंड विजय अध्याय अठरावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय सतरावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय सोळावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय पंधरावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय चौदावा

सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

पुढील लेख
Show comments