rashifal-2026

आयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल

Webdunia
मंगळवार, 17 एप्रिल 2018 (09:38 IST)

आयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार आता प्रवासी १२० दिवस आधी तिकीट बूक करु शकतील. ऑनलाईन बुकिंगमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे एक युजर आयडी वापरून महिन्याला फक्त ६ तिकीटं बूक करता येतील. जर यूजरनं त्याचं आधार कार्ड आयआरसीटीसीकडे रजिस्टर केलं तर महिन्याला १२ तिकीटं बूक करता येणार आहेत. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत फक्त २ तिकीटं बूक करता येणार आहेत तसंच या कालावधीमध्ये सिंगल पेज किंवा क्विक बुकिंग होणार नाही. यूजर ऑनलाईन आल्यावर त्याला वैयक्तिक माहितीही भरावी लागणार आहे.

बुकिंग एजंटसाठींच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. एजंट आता सकाळी ८ ते ८.३०, सकाळी १० ते १०.३० आणि ११ ते ११.३०मध्येच तिकीटं बूक करु शकतात. म्हणजेच एजंटना आता फक्त अर्धा तासच तिकीटं बूक करता येणार आहेत.  तत्काळ बुकिंग प्रवासाच्या एक दिवस आधीच १० वाजता सुरु होईल. जर ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा असेल तर यात्री त्याच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत मागू शकतो. ट्रेनचा मार्ग बदलला तरीही प्रवाशाला तिकीटाचे पैसे मागता येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

२ कोटी रुपये द्या नाहीतर...'सोलर ग्रुप'चे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या; संशयिताला ताब्यात घेण्यात आले

LIVE: सोलर ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना जीवे मारण्याची धमकी

प्रयागराजमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तलावात कोसळले

LIVE: मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत

पुढील लेख
Show comments