डार्क सर्कल्स लपवण्यासाठी कंसीलरची मदत घेणे सामान्य झाले आहे. पण बाजारात उपलब्ध कंसीलर केमिकलयुक्त असतात त्यापेक्षा कंसीलर घरीही तयार केलं जाऊ शकतं.
मध, कोरफड जेल, जिंक ऑक्साइडर मिसळून कंसीलर तयार केलं जाऊ शकतं. मधाने स्किन टोन आणि टेक्सचर सुधारतं. तसेच कोरफड जेल, कंसीलरला स्मूथ बनवतं आणि डोळ्याच्या स्किनला व्हिटॅमिन ए आणि इ प्रदान करतं. तसेच जिंक ऑक्साइड स्किनला यूव्ही रेजपासून बचाव करतं. आणि स्किनला मॉइश्चर करतं. हे सगळं मिक्स केल्यावर यात कोकोआ पावडर घालण्यात येते. स्किन टोनपेक्षा हलका कलर तयार व्हावा एवढीच कोकोआ पावडर मिसळावी.
कसे वापरावे
डोळ्याखाली कंसीलर लावण्यापूर्वी चेहर्यावर मॉइस्चरायझर लावून घ्या नंतर एसेंशियल ऑइल. आता कंसीलर डोळ्याच्या आतील कोपर्यापासून बाहेरपर्यंत पसरून घ्या. अधिक प्रमाणात न वापरता एक-दोन थेंब पुरेसे होतील. काही वेळासाठी कंसीलरला सेट होऊ द्या नंतर हलक्या हाताने स्किनला थापडा आणि कंसीलरला पूर्ण स्किनमध्ये ब्लेड करून घ्या.