rashifal-2026

नॅचरल मॉइश्चयरायजर

Webdunia
बुधवार, 27 जानेवारी 2021 (13:18 IST)
पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही.. काळजी का करता.. तुमच्या घरीच तुमच्या त्वचेला सुंदर बनविणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. त्वचेची सुंदरता आणि कोमलता कायम राखण्यासाठी आपल्या किचनमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या नॅचरल मॉइश्चिरायजरचं काम करतात. 
 
मध: त्वचेचं क्लिंन्जिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध.. मधाच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते आणि उजळतेही. यामुळे चेहरा, हातापायाची चमक कायम राहते.
 
ताक: ताक तुमच्या त्वचेतून डेड स्किन सेल्स बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुमची त्वचाही एव्हरयंग दिसते. एक सुती कपडा घेऊन तो थंड ताकात बुडवा आणि या कपड्यानं आपला चेहरा ५ ते १0 मिनिटांपर्यंत झाकून ठेवा.. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.
 
ऑलिव्ह ऑईल: गेल्या अनेक वर्षांपासून ऑलिव्ह ऑईल मॉइश्चघरायजर म्हणून वापरलं जातं. यामध्ये लेवेंडर असेन्शियल ऑईलचे काही थेंब टाकून आंघोळीच्या पाण्यात वापरा.. त्यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
 
नारळाचं तेल: नारळाचं तेल खूप चांगलं मॉइश्चहरायजर असतं. हे तेल प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक ठरतं. नारळाचं तेल वापरल्यानं अवेळी त्वचेवर सुरकुत्या दिसून येत नाही. दोन चमचे नारळाचं तेल, एक चमचा मध आणि एक चमचा संत्र्याचा रस मिसळून त्वचेवर लावा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.
 
काकडी: काकडीमध्ये ९५ टक्के पाण्याचा अंश असतो, त्यामुळे काकडी त्वचेचं मॉइश्चररायजेशन चांगल्या पद्धतीनं करू शकतं. काकडीचा रस चेहर्र्‍यावर आणि मानेवर ३0 मिनिटांपर्यंत लावून ठेवा.. त्यानंतर पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.
 
कोरफड: कोरफड हा सर्वोत्तम उपाय तुम्ही कधीही वापरू शकता. कारण त्वचा तेलकट असो वा कोरडी त्यासाठी कोरफड उपयोगी ठरतं. यामध्ये असणारे बीटा-कॅरोटिन, व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई' त्वचेला स्वस्थ ठेवतात. यासाठी कोरफडीचा गर चेहर्यारला लावून ठेवा.. आणि काही वेळाने धुऊन टाका.. मग पाहा, तुमच्या चेहर्र्‍याची चमक..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

झुरळांना पळवण्याचे प्रभावी घरगुती उपाय

Tadka Maggi हिवाळ्यात मॅगीचा नवीन स्वाद: हिवाळी स्पेशल देसी तडका मॅगी नक्की ट्राय करा

वारंवार सर्दी आणि खोकला होतोय? कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

सण आला हा संक्रांतीचा कविता

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments