Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमान कंपन्यांना 31 मे पर्यंत तिकीट दर वाढविण्यास मनाई

Webdunia
बुधवार, 28 एप्रिल 2021 (14:58 IST)
कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन विमान कंपन्यांना 31 मे पर्यंत तिकीट दर वाढविण्यास हवाई वाहतूक मंत्रालयाने मनाई केली आहे. कोरोना संकटामुळे विमान कंपन्यांकडून तिकिटांचे दर वाढवून नफेखोरी होऊ शकते, असेही हवाई वाहतूक मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी एकूण क्षमतेच्या तुलनेत 80 टक्के प्रवाशांची वाहतूक करण्याचे बंधन हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना घातले आहे. हे बंधनदेखील 31 मे पर्यंत कायम  असणार आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने ग्रीष्मकालीन शेड्यूल अंतर्गत विमान कंपन्यांना 18 हजार 843 फेर्या करण्यास मान्यता दिली होती. मार्चच्या अखेरपासून सुरु होणार्यान या सेवा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत चालू राहतील. मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढल्यामुळे प्रवाशांच्या   संख्येत मोठी घट झाली होती. त्याचा दणका विमान कंपन्यांना बसू शकतो.
 
नव्या प्राईस बँडनुसार दिल्ली-मुंबई रूटवर इकॉनॉमी क्लाससाठी एका बाजूचे भाडे 3900 ते 13 हजार रुपे इतके निश्चित करणत आलेले आहे. तत्पूर्वी हे भाडे 3500 ते 10 हजार रुपये इतके होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख