Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात पेट्रोलच्या दरानं गाठली उच्चांकी, केला रेकॉर्डब्रेक, मुंबईत पेट्रोल किंमत 100.47

Webdunia
सोमवार, 31 मे 2021 (11:36 IST)
देशात पेट्रोल -डिझेलच्या किंमतीनं नवा उच्चांक गाठला आहे. आज सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज डिझेलच्या दरात 24 ते 28 पैसे वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या किंमतीही 28 ते 29 पैशांवर पोचल्या आहेत. मुंबईतील पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यानंतर आज मुंबईत पेट्रोल किंमत 100.47 इतकी झाली आहे.
 
मुंबईत आज प्रति लिटरसाठी ग्राहकांना 100.47 असे पैसे मोजावे लागत आहेत. एनआयए या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. डिझेलच्या किंमतीने देखील नवा उच्चांकी आकडा गाठला आहे. मुंबईत डिझेलचे दर (Diesel price) 92. 45 रुपये आहे.
 
दिल्लीत पेट्रोलसाठी 94.23 तर डिझेलसाठी 85.15 रुपये मोजावे लागत आहेत. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशच्या अनूपनगरमध्ये 104.94 पेट्रोल आणि डिझेल 96.03 ला मिळत आहेत. चेन्नई - पेट्रोल 95.76 रुपये डिझेल 89.90 रुपये तर  कोलकात्ता येथे पेट्रोल 94 रुपये, डिझेल 88 रुपये किंमतीत मिळत आहे.
 
दररोज सहा वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
 
या मानकांच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. ग्राहकांना कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ते किरकोळ दराने ग्राहकांना स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.
 
आपल्या शहरातील किंमत किती आहे ते जाणून घ्या
एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेता येतात. इंडियनऑयलच्या वेबसाइटनुसार आपल्याला आरएसपी आणि आपला शहर कोड लिहावा लागेल आणि त्या क्रमांकावर 9224992249 क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड भिन्न आहे, जो आपल्याला आयओसीएल वेबसाइटवरून मिळेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments