Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

35 पेक्षा कमीच रिचार्ज आणि इतर कारण 25 कोटी सिम बंद होणार

Webdunia
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (08:41 IST)
मोबाईल वापरात असाल तर ही बातमी मोठी असून तुमच्या साठी आहे. आपल्या देशातील  25 कोटी मोबाईल युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली असून, टेलिकॉम कंपन्या 25 कोटी मोबाईल युजर्सचं सिम बंद करणार  आहेत. एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन यांचा या सिम बंदीत समावेश असणार आहे. जर तुम्ही प्रतिमहिना 35 रूपयांपेक्षा कमी रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुमचं सिम कधीही बंद होणार आहार. तर  या 25 कोटी मोबाईल युजर्समध्ये सर्वाधिक 2 जी मोबाईल युजर्सचा असणार आहेत.नवीन पद्धती नुसार 35 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज करण्याऱ्यांमध्ये एअरटेल कंपनीच्या ग्राहकांचा सर्वाधिक समावेश असून, त्यात 10 कोटी इतकी आहे. उर्वरीत 15 कोटी ग्राहकांमध्ये आयडिया आणि व्होडाफोन ग्राहक आहेत. आयडिया आणि व्होडाफोन कंपन्यांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी 35 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे रिजार्च उपलब्ध करुन दिले. मात्र, त्यांना याचा मोठा फटका बसतो आहे.
 
स्मार्टफोनमुळे देशातील बहुतांश लोक मोबाईलमध्ये डबल सिम आहेत.देशात अनेक मोबाईल वापरकर्ते 2 किंवा अधिक सिम आपल्याकडे बाळगतात. त्यामुळे त्यांना खूप कमी वेळा रिचार्ज करण्याची गरज पडते. टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयामुळे अशा ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
 
टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एअरटेलच्या 10 कोटी ग्राहकांनी महिन्याला 10 रुपयांचा रिचार्ज केल्यावर कंपनीच्या खात्यात 100 कोटी रुपये जमा होतात. ज्यावेळी एअरटेलचे ग्राहक 35 रुपयांचा रिचार्ज करतील. तेव्हा कंपनीच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच, या निर्णयामागचं दुसरं कारण म्हणजे, 2 जी ग्राहकांना 4 जी मध्ये स्विच करणं असणार आहे.मात्र जर यांनी ज्यांचे सीम बंद झाले त्यांनी जियो घेतले तर मग इतर कंपन्या पुन्हा अडचणीत येतील आणि जियोला फायदा होईल असे सुद्धा तज्ञाना वाटते. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments