Festival Posters

या अभिनेत्रीने केले पांड्याला क्लीन बोल्ड

Webdunia
गुरूवार, 2 जानेवारी 2020 (13:18 IST)
दुखापतीमुळे क्रिकेटपासून अनेक दिवसांपासून दूर असलेला हार्दिक पांड्या सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. हार्दिकने इस्टाग्रामवर अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिच्याबरोबर फोटो पोस्ट केला आहे. तिच्यासोबत हातात हात धरून शेअर केलेला हा फोटो पाहून त्यांनी आपल्या नाच्याची पुष्टी केल्याचे म्हटले जाते. हार्दिकने हा फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच शुभेच्छाही दिल्या.
Photo : Instagram
फोटोशेअर करताना हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, मझ्या फायरवर्कसोबत नवीन वर्षाची सुरुवात. यासह हार्दिकने हृदयाची इमोजीही तयार केली आहे. हार्दिकच्या या फोटोवर युजवेंद्र चहल, अर्जुन कपूर, पंखुरी शर्मा, सिद्धेश लाड, पूर्णा पटेल, सोफी चौधरी, क्रिस्टल डिसूझा यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.
 
या फोटोनंतर हार्दिक आणि नताशाचे नाते अधिकृत मानले जात आहे. ऑगस्ट 2019 पासून हार्दिक आणि नताशाविषीच्या बातम्यांना ऊत आला आहे.
दोघांना बर्‍याचदा एकत्र पाहिले गेले होते. काही प्रसारामाध्यमांच्या वृत्तानुसार हार्दिकने दोन दिवसांपूर्वी नताशाला आपल्या कुटुंबाशी ओळख करुन दिली आहे. हार्दिकने सोशल मीडिावर नताशासाठी मतेही मागितली होती. नताशा हिने छोट्या पडद्यावरील नच बलिये या शोमध्ये सहभाग घेतला होता. तसेच हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाला नताशाने सोशल मीडियावर हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली होती. दोघांनी दुबईमध्ये सुट्‌ट्यांचा आनंद घेतल्याचे फोटो व्हारल झाले होते. त्यानंतर दोघेही डेटिंग करत असल्याची चर्चा होती. दरम्यान, हार्दिक पांड्याचे नाव यापूर्वी अभिनेत्री इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एलीअवरा यच्याशी जोडले गेले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, शाई होप नेतृत्व करणार

रोमांचक सामन्यात मुंबईने बेंगळुरूचा 15 धावांनी पराभव केला

आयसीसीने बांगलादेशला टी20 विश्वचषकातून बाहेर केले, स्कॉटलंडचा प्रवेश

T20 World Cup आयसीसीने बांगलादेशला आरसा दाखवला; टी२० विश्वचषकातून बांगलादेशला वगळण्यात आले

भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट्सने पराभव केला

पुढील लेख
Show comments