Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सॅटर्डे क्लबतर्फे राज्यस्तरीय ‘उद्योगकुंभ २०१८’ चे आयोजन

Webdunia
शनिवार, 25 ऑगस्ट 2018 (15:58 IST)
उद्योग जगतात कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टकडून राज्यस्तरीय ‘उद्योगकुंभ २०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘उद्योगकुंभ २०१८’ मध्ये राज्यातून नामवंत आणि नवीन उद्योजक सहभागी होणार आहेत. यात सर्व तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यात उद्योगाच्या नवीन संधी, अंतर्गत उद्योग व्यवसाय विकास, व्यवसाय निर्मितीमधील समस्यांवर तोडगा, उद्योग व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, व्यवसायातील भांडवल उभारणी, कायदेशीर सल्ला आदी विषयांवर सर्व माहिती ‘उद्योगकुंभ २०१८’ मधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.  येत्या १ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी साडेसात वाजेपासून शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इन, मुंबई आग्रा रोड येथे एकदिवसीय स्वरूपाचा हा उद्योजकांचा कुंभ भरणार आहे. या ‘उद्योगकुंभ २०१८’ मध्ये सहभागी होण्यासाठी अद्याप काही जागा शिल्लक असून इच्छुक व्यक्तीनी http://udyogkumbh.com/ वर जाऊन नावनोंदणी करायची आहे. सोबत प्रवेश शुल्क देखील भरावयाचे आहे. अधिक माहितीसाठी संदीप सोमवंशी  9850952266, प्रणिता पगारे 9967989444 आणि योगेश नेरकर 9503842431 यांच्याकडे संपर्क साधता येईल.
 
‘एकमेका सहाय्य करून अवघे होऊ श्रीमंत’ हा विचार घेऊन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे उद्योग विकासासाठी काम सुरु आहे. या कामाचा अधिक विस्तार होण्यासाठी आणि सदरची चळवळ अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्लबचे सातत्याने काम सुरु असते. याच कामाचा एक भाग म्हणून ‘उद्योगकुंभ २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे.मुळात मराठी माणूस उद्योग व्यवसायासाठी पुढाकार घेत नाही. व्यवसायात जोखीम असते  हाच विचार घेऊन तो काम करतो. मराठी माणसाची ही मानसिकता बदलण्यासाठी, उद्योग व्यवसाय क्षेत्राची संपूर्ण माहिती होणे अनिर्वाय आहे. लोकांची हीच मानसिकता बदलण्याच्या हेतूने यंदा #Change अर्थात ‘बदल’ हे ब्रिद घेऊन “उद्योगकुंभ २०१८” चे आयोजन करण्यात आले आहे. 
 
यावेळी ‘उद्योगकुंभ २०१८’ विषयी विभागीय सचिव संजय मोरे, संदीप सोमवंशी, प्रशांत जोशी यांनी माहिती दिली. व्यवसाय म्हणजे काय, कसा करावा सोबतच आर्थिक संकट आले तर घाबरून न जाता नेटाने व्यवसाय कसा वाढवाव, नवीन संधी कुठे उपलब्ध आहेत,  सोबतच त्या कशा उपलब्ध होऊ शकतात यावर संबधित विषयातील तज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन असे ‘उद्योगकुंभ २०१८’ या राज्यस्तरीय परिषदेचे चालू वर्षाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावर्षी ‘उद्योगकुंभ २०१८’ करीता देशात उद्योग क्षेत्रातील तज्ञ व यशस्वी उद्योजक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश हावरे, राज्यमंत्री, अध्यक्ष साई संस्थान, हावरे बिल्डर., श्री.अच्युत गोडबोले प्रसिद्ध आंतराष्ट्रीय आय.टी. तज्ञ तथा प्रसिद्ध लेखक, श्री.नितीन पोद्दार, प्रसिद्ध राष्ट्रीय स्तरावरील कॉर्पोरेट लॉयर, रेखा चौधरी आंतराष्ट्रीय सौंदर्य तज्ञ, कॅप्टन श्री.अमोल यादव मेक इंडिया उपक्रमातील राज्य शासनाचे भागीदार, भावेश भाटीया उद्योजक सनराईज मोल्ड चे संस्थापक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
सोबतच प्रमुक मार्गदर्श वक्ते म्हणून  श्री.पियुष सोमाणी क्लाऊड सर्विसेस, सुधीर मुतालिक ऑईल आणि एनर्जी तज्ञ, श्रीकृष्ण गांगुर्डे करार पद्धतीने कुकूटपालन निर्माते, श्रीरंग तांबे उद्योगवाढ सल्लागार, विक्रांत पोतनीस निवेशक, बाळकृष्ण चांडक आर्थिक सल्लागार पॅनल मागर्दर्शन करणार आहे.
 
सदरची परिषद एक दिवसीय स्वरूपाची असून विविध सत्रांमध्ये संपन्न होणार आहे. यावेळी मान्यवरांशी थेट संवाद साधता येणार आहे. तरी या परिषदेचा लाभ उद्योजकांनी घ्यावी अशी विनंती आयोजक सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांनी केली आहे.यावेळी महेश सावरीकर अध्यक्ष नाशिक चॅप्टर, प्रवीण काकड अध्यक्ष नाशिक १चॅप्टर, प्रशांत जोशी परिषद प्रमुख, अर्चना जंगडा खजिनदार नाशिक १ चॅप्टर, चारुशीला कुलकर्णी  नाशिक १ चॅप्टर, झाकीर मन्सुरी,अमोल कासार, मधुरा क्षेमकल्याणी, तुषार पाटील, पराग मनोलकर, समीर शहा, आदी  मान्यवर उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची किंमत निश्चित, बाईक-ऑटोसाठी एवढी किंमत मोजावी लागेल

बीडच्या नक्षलवाद्यांवर फडणवीस कारवाई करणार का? सरपंच हत्येप्रकरणी संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

LIVE: उद्योगांसह सर्वांना स्वस्त वीज उपलब्ध करून दिली जाईल म्हणाले फडणवीस

BMC Election 2025: मुंबईत शिवसेनेचा युबीटीचा आधार किती ? बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव यांनी तीन दिवसांचा आढावा घेतला

ठाण्यामध्ये वृध्द दाम्पत्याला आत्महत्या कारण्यापासून मनपा कर्मचारी आणि पोलिसांनी रोखले

पुढील लेख
Show comments