Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

AIIMS Recruitment 2023: AIIMS दिल्लीमध्ये 3036 पदांसाठी भरती, पात्रता, तपशील जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (12:50 IST)
AIIMS Recruitment 2023:सरकारी नौकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने ग्रुप बी आणि सी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती AIIMS द्वारे सामाईक भरती परीक्षा 2023 अंतर्गत घेतली जाईल.

भरतीद्वारे 3036 पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. AIIMS कॉमन रिक्रूटमेंट परीक्षा 2023 साठी ऑनलाइन अर्ज 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाले आहेत. तर AIIMS सामायिक भरती परीक्षा 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत  आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांच्या अर्जाची स्थिती AIIMS द्वारे 5 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि प्रवेशपत्र 12 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केले जाईल. AIIMS सामायिक भरती परीक्षा 2023 ही 18 डिसेंबर आणि 20 डिसेंबर 2023 रोजी घेतली जाईल. उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
 
तपशील- 
वयोमर्यादा- 
AIIMS सामायिक भरती परीक्षा 2023 साठी वयोमर्यादा वेगळी आहे.  
1 डिसेंबर 2023 हा आधार मानून वयाची गणना केली जाईल.
 OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
 
अर्ज फी-
सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्जाची फी 3000 रुपये  आहे. 
 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि EWS साठी अर्ज शुल्क 2400 रुपये आहे. फी ऑनलाईन भरता येईल.
 
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाईल. अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन उमेदवार अधिक माहिती तपासू शकतात.
 
अर्ज प्रक्रिया- 
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
- वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- फॉर्म भरा आणि फी भरा.
-आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करून स्वतःकडे जतन करून ठेवा.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : राजाची प्रेमकथा

चिकन फ्राईड राइस रेसिपी

झटपट बनणारे मटार समोसे रेसिपी

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments