Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भेसळयुक्त गव्हाच्या पीठाची ओळख या पद्धतीने करा

Webdunia
शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (20:00 IST)
आज च्या युगात प्रत्येक वस्तू मध्ये भेसळ असल्याच्या बातम्या येतात. काही लोक थोड्याश्या फायद्या साठी लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्यात देखील कमी करत नाही. आपण जे गव्हाचं पीठ वापरतो त्या मध्ये भेसळ असू शकते. जर आपण भेसळयुक्त पिठाचे सेवन करतो तर हे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. म्हणून आपल्याला बनावटी आणि खऱ्या पिठाची ओळख करता आली  पाहिजे, आम्ही सांगत आहोत अशाच काही पद्धती बद्दल ज्यांना वापरून आपण केवळ पिठाचीच भेसळ ओळखू शकत नाही तर आपल्या आरोग्याला होणाऱ्या हानीला देखील टाळू शकतो.  
 
गव्हाच्या पिठात अनेक प्रकारे भेसळ करतात. जसं की बऱ्याच वेळा पिठात खडू पावडर, मैदा, किंवा बोरिक पावडर देखील मिसळतात. अशा परिस्थितीत या पिठाचे सेवन कधीही करू नये. पिठात भेसळ आहे किंवा नाही हे शोधण्याच्या कामात पाणी देखील मदत करेल.  
आपल्याला काय करावयाचे आहे की एका ग्लासात पाणी घ्या या मध्ये अर्धा चमचा गव्हाचं पीठ घाला. जर आपल्याला पाण्याच्या वर काही तरंगत दिसत असेल तर समजावं की हे पीठ भेसळीचे आहे.  
 
पिठात केलेली भेसळ ओळखण्यासाठी आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडचा वापर देखील करू शकता. जर आपण हा विचार करीत आहात की या साठी पिठाला लॅब मध्ये न्यावं लागेल, तर असं काहीच नाही आपण हायड्रोक्लोरिक चा वापर घरात देखील करू शकता. जेणे करून आपण पिठातली भेसळ ओळखू शकाल आणि आपल्याला आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्प्रभावा पासून वाचता येईल या साठी आपल्याला गरज आहे एक टेस्ट ट्यूब आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड ची.       
 
टेस्ट ट्यूब आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड सहजपणे बाजारपेठेत औषधांच्या दुकानात मिळेल. पिठात भेसळ आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका टेस्ट ट्यूब मध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचे आहे. नंतर या मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घालावयाचे आहे. काही वेळा नंतर काही गाळ दिसेल तर समजावं की हे पीठ भेसळयुक्त आहे. या मध्ये खडूच्या पावडरची भेसळ केलेली आहे.
 
* लिंबाच्या साहाय्याने  देखील  वास्तविक आणि भेसळयुक्त पीठ ओळखले जाऊ शकतो. या साठी आपल्याला गव्हाचं पीठ आणि एक लिंबू पाहिजे, ज्याच्या साहाय्याने आपण ही चाचणी  करावयाची आहे. या साठी सर्वप्रथम एका चमचा पीठ घ्या आणि त्याच्या वर लिंबाच्या रसाचे काही थेंबा घाला. लिंबाचा रस घातल्यावर जर बुडबुडे येत असतील, तर समजावं की पीठ भेसळयुक्त आहे. पिठा मध्ये बुडबुडे तेव्हाच येतात जेव्हा या मध्ये खडू पावडर ची भेसळ केलेली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments